आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरचा कसोटी डाव अविस्मरणीय - जॅक कॅलिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखेरच्या कसोटी डावासाठी फलंदाजीसाठी जाताना विचित्र भावना मनात दाटून आल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यासाठी उद्या नाही याची जाणीव सतत होत होती. देशासाठी शतक झळकाविण्याची ही अखेरची संधी आहे, असे मनोमन वाटत होते आणि जेव्हा ‘नर्व्हस नाइंटीज’च्या जवळ पोहोचलो तेव्हा एक वेगळेच दडपण जाणवत होते. नेहमीपेक्षा ते दडपण वेगळेच होते आणि जेव्हा शतक पूर्ण झाले तेव्हाची भावना वेगळीच होती, असे आपल्या अखेरच्या कसोटी डावात शतक झळकाविल्यानंतर जॅक कॅलिसने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या शतकी डावादरम्यानची अगतिकता आणि एकाग्रता मिळविण्यासाठीच्या अडचणी कॅलिसने कथन केल्या.
3 विकेट पाठोपाठ गमावल्यानंतर डाव सावरणे महत्त्वाचे होते. आम्ही विकेट राखून धावफलक हलता ठेवण्याचे प्रयत्न केले. खेळपट्टी संथ असल्यामुळे धावा वेगात काढता येत नव्हत्या. भारताची धावसंख्या जशी जवळ आली, त्यानंतर आम्ही आक्रमक झालो. त्यामुळेच नंतर धावसंख्या वेगात वाढू शकली.
कॅलिसने मानले टीम इंडियाचे खास आभार
० निवृत्तीमुळे माझे कुटुंबीय आणि फाउंडेशनचे सदस्य, मुले आनंदित झाली आहेत. कारण त्यांच्यासाठी मला अधिक वेळ देता येणार आहे.
० आता माझा अंतिम कसोटी सामना आहे म्हणून आलेल्या प्रेक्षकांनी, माझ्या चाहत्यांनी, दक्षिण आफ्रिका संघातील सहका-यांनी माझ्यासाठी हा सामना ‘स्पेशल’ केला.
० गेल्या 18 वर्षांत काहीच बदलले नाही. पहिल्या कसोटीपासून या अखेरच्या कसोटीपर्यंत दिनक्रम तोच राहिला.
० धोनी व भारतीय संघाने मला जी मानवंदना दिली, ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
० मी पहिली कसोटी खेळलो त्या वेळी तो सामना पाहण्यासाठी माझे वडील उपस्थित होते. आता अखेरचा कसोटी खेळलो तेव्हा माझी बहीण व अन्य कुटुंबीय फाउंडेशनची मुले उपस्थित होती.
शालेय जीवनापासून आतापर्यंतचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व अन्य व्यक्तींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, त्या सर्वांचे आभार.