आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे वर्ष माझ्यासाठी खूपच वाईट ठरले - आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरते 2013 हे वर्ष माझ्यासाठी अत्यंत वाईट ठरले, अशी प्रतिक्रिया विश्व चॅम्पियनशिपचा किताब गमावणारा भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने व्यक्त केली.
विश्व चॅम्पियनशिप गमावल्यानंतर लंडन येथे क्लासिक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत आनंदचा पराभव झाला होता. ‘हे वर्ष मला खूपच वाईट ठरले. हे वर्ष भीतिदायक होते, असे म्हटले तरीही ते चुकीचे ठरणार नाही. मी या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये माझा किताब वाचवला असता, तर कदाचित सर्वकाही सुरळीत झाले असते. मात्र, मी त्या स्पध्रेत चांगली कामगिरी करू शकलो नाही. इतकेच नव्हे, तर संपूर्ण वर्षात इतर स्पर्धांतही माझी कामगिरी दज्रेदार नव्हतीच, असे आनंदने म्हटले.