आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest ATP Rankings: Somdev Moves Up To 113th, Ankita Placed 352nd

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमदेवची दोन स्थानांनी प्रगती; बोपन्नाचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताच्या सोमदेव देववर्मनने नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी क्रमवारीत दोन स्थानांच्या सुधारणेसह 113 वे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे रोहन बोपन्नाला दुहेरीच्या क्रमवारीत दोन स्थानांचे नुकसान झाले आहे.

सोमदेवने नुकत्याच झालेल्या वॉशिग्ंटन ओपन टेनिस स्पर्धेच्या प्रीक्वार्टर फायनलमध्ये धडक दिली होती. आपल्या या शानदार कामगिरीमुळे तो पुन्हा टॉप 100 च्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. कॅनडात रोर्जस चषकाचे विजेतेपद पटकावणारा स्पेनचा राफेल नदाल एका स्थानाच्या प्रगतीसह तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. त्याने कॅनाडाच्या मिलोस राओनिकला पराभूत केले. या स्पर्धेतील विजयासह त्याने करियरमध्ये 25 वा मास्टर्स किताब जिंकला. रोर्जस चषकाच्या पहिल्या फेरीत पराभवाचे नुकसान रोहन बोपन्नाला क्रमवारीत झाले. दोन स्थानांच्या घसरणीसह तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. महेश भूपती एका स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या तर लियांडर पेस दहाव्या क्रमांकावर कायम आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा एका स्थानाच्या प्रगतीसह 18 व्या क्रमांकावर आली आहे.