आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Bcci Explains Wives Of Cricketers Distracted In England Test Series

विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकणार म्हणूनच BCCI ने दिली हॉटेल शेअरिंगला परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - विराट आणि अनुष्‍का शर्मा)
मुंबई - विदेश दौ-यावर क्रिकेटपटूंना पत्‍नींनाच सोबत नेता येते असा नियम असताना उपकर्णधार विराट कोहलीने इंग्‍लंड दौ-यावर गर्लफ्रेंड अनुष्‍का शर्माला नेले होते. विराट आणि अनुष्‍का लवकर लग्‍न करणार आहेत. विराट आणि अनुष्‍का यांना सोबत राहुदेण्‍यासाठी संजय पाटील यांनी लंडनच्‍या संघ व्‍यवस्‍थापकाला फोन केल्‍याचे एका इंग्रजी दैनिकाने म्‍हटले आहे.
इंग्‍लंडकडून झालेल्‍या लाजीरवाण्‍या पराभवानंतर भारतीय संघ्‍ा टीकाकारांचे लक्ष बनला आहे. बीसीसीआयनेच स्‍पष्‍ट केले की, 'क्रिकेटपटूंना सराव किंवा व्‍यायाम करायच्‍या वेळेमध्‍ये त्‍यांच्‍या पत्‍नीसोबत फिरायला जावे लागत होते. त्‍यामुळे भारतीय क्रिकेटपटू चांगली कामगिरी करु शकले नाहीत.'
पत्‍नीना भेटण्‍यासाठी विशिष्‍ट वेळ
बीसीसीआयच्‍या एका अधिका-याने सांगितले की, 'भारतीय क्रिकेट बोर्ड आता ऑस्‍ट्रेलिया आणि इंग्‍लंड वेल्‍स क्रिकेट बोर्डाप्रमाणे नियम करण्‍याच्‍या विचारात आहे. हे बोर्ड विदेशी दौ-याच्‍या वेळी खेळाडूंसाठी विशिष्ट वेळ ठेवतात. त्‍याच वेळेमध्‍ये त्‍यांना आपल्‍या पत्‍नींना भेटता येते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, इंग्‍लंड दौ-यावरील खेळाडूंच्‍या पत्‍नीचे छायाचित्रे..