आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजतर्रार बोल्टमुळे जमैका फायनलमध्ये, 4 बाय 100 मीटर प्रकारात शानदार कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - सहा ऑलिम्पिक स्पर्धेतील किताब विजेता धावपटू उसेन बोल्टच्या नेतृत्त्वाखालील जमैका संघाने राष्ट्रकुलमध्ये 4 बाय 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. पात्रता फेरीच्या फायनलमध्ये वेगवान धावपटू बोल्टने नायजेरियन खेळाडूंना मागे सारून 38.99 सेकंदात पहिले स्थान गाठले.
तेजतर्रार बोल्टला पाहण्यासाठी हॅम्पडन पार्क मैदान प्रेक्षकांनी भरले होते. तो पहिल्यांदाच राष्ट्रकुलमध्ये धावला. बोल्ट म्हणाला की, खेळाचा आनंद घेण्यासाठी आलो आहे. अंतिम फेरीत पूर्ण ताकदीने धावेन. या सत्रातील पहिलीच स्पर्धा असल्यामुळे थोडेसे आळसावल्यासारखे वाटत होते. लयीत यायला थोडा वेळ लागेल. स्कॉटलंड येथील राष्ट्रकुलमधील सहभागामुळे मी फार आनंदी आहे. जमैका संघासमवेत जाणे हा माझ्यसाठी फारच चांगला अनुभव आहे, असेही बोल्टने सांगितले.