आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयला चिअर लीडर्सचा मोह आवरेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांपाठोपाठ चिअर लीडर्सदेखील आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा चिअर लीडर्सवरचा मोह आवरता आवरेनासा झाला आहे.
संयुक्त अरब अमिरात येथील पहिल्या टप्प्याच्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान, चिअर लीडर्स पूर्ण कपड्यांसह नृत्याविष्कार करत होत्या. मात्र, आता भारतात त्याच्या नृत्यांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. भारतातील दुसर्‍या टप्प्याच्या सामन्यादरम्यान, चिअर लीडर्स सर्रास तोकड्या कपड्यांचा वापर करत असल्याचे दिसत आहे. मात्र, याला अद्याप आयपीएलच्या आयोजन समितीने कोणतीही बंदी घातलेली नाही.

आयपीएल जैसे थे!
आयपीएलचा चेहरामोहरा बदलण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर आयपीएलमध्ये मोठा बदल करणार असल्याचे गावसकरांनी सांगितले. त्यामुळे फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा बट्टा लागलेल्या आयपीएलची प्रतिमा उजळेल, असे वाटत होते. मात्र, अद्याप 25 सामन्यांपर्यंत यात कोणताही बदल झालेला नाही. यामधील वाद, चिअर लीडर्सचा प्रवेश हे सारे काही पहिल्यासारखेच कायम आहे.
सावंतांच्या आश्वासनाची ‘विकेट’
गतवर्षी डिसेंबरमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी आगामी सातव्या सत्राच्या आयपीएलमध्ये चिअर लीडर्सला स्थान देण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत याच चिअर लीडर्संनी सावंताच्या आश्वासनाची विकेट घेतली अन् पुन्हा एकदा मैदानावर ताबा मिळवला.