आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi BCCI And MCI Controversy On Wankhede Stadium

बीसीसीआय-एमसीए वाद मिटला; वानखेडे स्टेडियमवरच होणार सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा 30 मे रोजी दुसरा निर्णायक सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे. तो सामना आता न हलवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने घेतला आहे. त्यानंतर अंतिम सामनाही वानखेडे स्टेडियमवर होईल.
वानखेडेवर सुरक्षेचा आभाव असल्याचा फाटका मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांना बसला होता. 3 मे रोजी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीसाठी आलेल्या काही बीसीसीआय सदस्यांना ‘कार पार्क’ पासेस मिळाले नाहीत. सुरक्षेच्या कारणावरून सावंत यांची मुंबई क्रिकेट संघटनेविरुद्ध गैरसमजूत झाली होती. त्यानंतर सावंत यांना वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षेची जबाबदारी मुंबई संघटनेची नसून ती मुंबई इंडियन्स संघाची असल्याचे लक्षात आणून देण्यात आले. त्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. या गैरसमुजीमुळे मुंबई क्रिकेट संघटना आणि भारतीय क्रिकेट मंडळात युद्ध होण्यापूर्वी टळले.