आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Sports 25 Coach Recruitment For Aurangabad Division

औरंगाबाद विभागात नेमणार 25 क्रीडा मार्गदर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी शाळांच्या नियमित वेळापत्रकाशिवाय शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी मानधन तत्त्वावर क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यात 200 शाळेत क्रीडा मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. यात औरंगाबाद विभागात 25 मार्गदर्शकांची नियुक्ती होईल. या क्रीडा मार्गदर्शकांची दरमहा 5 हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
या मार्गदर्शकांमध्ये क्रीडा शिक्षकांनादेखील संधी देण्यात येणार आहे. शासन मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक अथवा सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांचा यांनाही यासाठी पात्र धरले जाईल. त्याचप्रमाणे एनआयएस, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राज्य पदक विजेता खेळाडू, जे इतर ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीस असलेल्याची क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती होईल.

असे असेल प्रशिक्षण
नेमण्यात आलेले प्रशिक्षक शाळांच्या नियमित वेळापत्रकाव्यतिरिक्त शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी दोन सत्रांत मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे सुटीच्या कालावधीमध्ये क्रीडा प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

मार्गदर्शकांचे मूल्यमापन
प्रत्येक तीन वर्षांनंतर संचालक क्रीडा व युवक सेवा या क्रीडा मार्गदर्शकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. त्यांच्या प्रत्येक 3 वर्षांच्या कार्याचा अहवाल घेतला जाईल. या मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणाखाली घडलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्पध्रेत सहभागी झालेले असतील, तर अशा शाळांतील मार्गदर्शकास पुन्हा 3 वर्षांची नियुक्ती दिली जाणार आहे.
नवे धोरण