आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोहतक- हरियाणामध्ये पहिला आणि शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी पोहोचलेला सचिन रिवोली हॉटेलमध्ये उतरणार आहे. त्याच्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाने विशेष व्यवस्था केली आहे. सचिनसाठी हॉटेलमध्ये खास रूम बनवली आहे. त्या रूमला 'सचिन सुट' असे नावाही दिले आहे. या रूमला पूर्णपणे नवा लुक देण्यात आला आहे. रूमच्या वॉलपेपरपासून फर्निचरपर्यंत सर्व काही नवीन आहे. सचिनच्या घरासारखे वातावरण ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला आहे.
खास सी फूडसाठी बाहेरून बोलावले चार शेफ
हॉटेलमध्ये खास सचिनच्या पंसतीच्या सी फूडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सी फूड फिश व प्रॉन्स तयार करण्यासाठी दिल्लीवरून चार शेफला बोलावण्यात आले आहे.
फोटो- हॉटेल रिवोलीमध्ये सचिनसाठी सजवण्यात आलेली खास रूम 'सचिन सूट'
पुढच्या स्लाईडला क्लिक करून वाचा सचिनच्या सुरक्षेसाठीचे टॉप सिक्रेट प्लॅन...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.