आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News Saina Nehwal Wins Australian Super Series

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियन सुपर सिरीजमध्ये सायनाला विजेतेपद, स्पेनच्या केरोलिनावर केली मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने एकेरीच्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिनचा पराभव केला. भारताच्या खेळाडूने 21-18, 21-11 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. याशिवाय सायनाने अवघ्या 43 मिनिटांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या किताबावर नाव कोरले. सायनाने तब्बल दोन वर्षांच्या दीर्घ मेहनतीनंतर सुपर सिरीजचे अजिंक्यपद पटकावले.

सायनाची 43 मिनिटे झुंज
सायनाने 43 मिनिटे शर्थीची झुंज देत विजयर्शी खेचून आणली. दरम्यान, 21 वर्षीय मरिनने पुनरागमनाचा प्रयत्न करत सायनाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने मरिनचे डावपेच शेवटपर्यंत यशस्वी होऊ दिले नाहीत. सरस खेळी करताना सायनाने सरळ दोन गेममध्ये सामना जिंकला. यासह मरिनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सत्रातील दुसरा किताब
लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालने यंदाच्या सत्रातील आपल्या दुसर्‍या किताबावर नाव कोरले. यापूर्वी तिने सत्राच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. दरम्यान, तिने तब्बल पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर घवघवीत यश संपादन केले.
फोटो - विजयानंतर सायनाच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट झालेला फोटो.
पुढे वाचा - काय म्हणाली सायना विजयानंतर