(प्ले बॉय मॉडेल इमिली स्कॉटला शेन वॉर्नने असे उचलले.)
ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकदा लव्ह अफेअरवरून चर्चेत आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्लेबॉय मॉडेल इमिली स्कॉट आणि शेन वॉर्न सोबत फिरताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाचे बॉक्सिंग चॅम्पिअन जेफ फेनेच यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आय़ोजित करण्यात आलेल्या पार्टीत दोघे सोबत दिसले होते. आता शेन वॉर्नने TWITTER वर घोषणा करून खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे.
शेन वॉर्नने ट्विट करून दिली माहिती
विम्बल्डनमध्ये राफेल नडाल याला हरविणारा ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किरगियोस याचा सामना बघायला जाण्यापूर्वी शेन वॉर्नने ट्विट केले, की मी गर्लफ्रेंड इमिली स्कॉटसोबत सामना बघायला जात आहे. ती अगदी स्मोकिंग हॉट दिसत आहे. हाहाहा...
दिडशे लोकांसमोर केला किस
जेफ फेनेच यांच्या पार्टीत शेन वॉर्नने इमिली स्कॉटला किस केला. यावेळी सुमारे 150 लोक उपस्थित होते. वॉर्नला माजी पत्नी सिमोन कॅलेन हिच्यापासून तीन मुले आहेत. त्यानंतर त्याचे अभिनेत्री लिज हर्लेसोबत प्रेमप्रकरण होते. दोघांनी साखरपुडाही केला होता. त्यानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. दोघे संबंधांमधून बाहेर पडले.
शेन वॉर्नच्या तुलनेत स्कॉट 14 वर्षे लहान
दोघांच्या वयाचा विचार केला तर शेन वॉर्न इमिलीपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. त्याची माजी प्रेमसी लिज हर्ले त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान होती. या दोघांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून घनिष्ठ मैत्री होती.
पुढील स्लाईडवर बघा शेन वॉर्न आणि इमिली स्कॉटचे हटके फोटो...