न्यूयॉर्क -अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रॅँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली अाहे. करिअरमधील १८ व्या ग्रॅँडस्लॅमसाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेनाची फायनल कॅराेलीन वाेज्नियाकाशी हाेईल. या वेळी १७ व्या मानांकित मकाराेवाचे पराभवामुळे अाव्हान संपुष्टात अाले.
जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत रशियाच्या मकाराेवाचा पराभव केला. ितने अवघ्या ६० मिनिटांत सरळ दाेन सेटमध्ये उपांत्य सामना जिंकला. सेरेनाने ६-१, ६-३ अशा फरकाने सामना अापल्या नावे केला. जबरदस्त फाॅर्मात असलेल्या सेरेनाने तासाभरात अंितम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला.
मकारोवाचे स्वप्न भंगले
मकारोवाने प्रथमच कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला हाेता. पराभवामुळे तिचे अंतिम फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. सेरेनाविरुद्ध लढतीत मकाराेवाने दुसऱ्या सेटमध्ये प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फार काळ निभाव लागला नाही. ‘सेरेना महान खेळाडू आहे. तिच्या खेळीमुळे प्रत्युत्तरासाठी मोठी कसरत करावी लागली,’असे मकाराेवा म्हणाली. या वेळी तिला उपांत्य फेरीनंतर बाहेर पडावे लागले.
जखमी पेंगची माघार
कॅरोलीन वोज्नियाकीविरुद्ध उपांत्य लढतीत चीनच्या पेंगला गंभीर दुखापतीमुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली. वोज्नियाकीने दमदार सुरुवात करताना पहिला सेट जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही चीनची बिगरमानांकित खेळाडू ३-४ ने पिछाडीवर होती. पायाला झालेल्या दुखापतीमुळे पेंग शुआईला खेळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
वोज्नियाकी यशस्वी
कॅरोलीन वोज्नियाकीने उपांत्य लढतीत बिगरमानांकित पेंग शुअाईविरुद्ध दमदार सुरुवात केली. मात्र, पहिल्याच सेटमध्ये तिला चीनच्या खेळाडूने चांगलेच झुंजवले. मात्र, ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये वोज्नियाकीने बाजी मारली. यािशवाय तिने अाघाडीही मिळवली. त्यानंतरही तिने आक्रमक लय कायम ठेवली.