आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद संघाचा सांगलीवर विजय, राहुल शर्माचे दीड शतक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लातूर येथे सुरू असलेल्या राज्य निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद संघाने राहुल शर्माच्या दीडशतकी खेळीच्या बळावर सांगलीवर पहिल्या डावाची आघाडी व 153 धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यात सय्यद वाहेदने एकूण 6 बळी घेतले. स्पर्धेत एकही सामना न गमावणारा जिल्ह्याचा संघ शानदार फॉर्मात आहे.
जिल्ह्याच्या गोलंदाजांनी केलेल्या तुफानी माºयापुढे सांगलीचा पहिला डाव सर्वबाद 117 धावांत आटोपला. गोलंदाजीत सय्यद वाहेद , विश्वजित उढाण, प्रदीप जगदाळे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. जिल्ह्याच्या संघाने कालच्या 6 बाद 191 धावांच्या पुढे खेळताना 270 धावा काढल्या. दिवसअखेर नाबाद 85 धावांवर खेळणाºया राहुल शर्माने शानदार (151) दीडशतकी खेळी साकारली. कर्णधार सुशांत मोदाणीने शानदार 55, स्वप्नील खडसेने 22 धावा केल्या. प्रत्युत्तरात सांगली संघाने 4 बाद 149 धावा काढल्या. यात गणेश कुकडेने 50, सुमीत चव्हाण 37, तर सतेज हरूगडेने नाबाद 30 धावा केल्या. गोलंदाजीत सय्यद वाहेदने 33 धावा देत 3 गडी बाद केले. सुशांतने 1 गडी टिपला.