आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात सापडलेल्या लक्ष्मणच्या मदतीला गंभीर !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ - सुमार फॉर्माशी झगडत असलेल्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या मदतीला सलामीवीर गौतम गंभीर धावला आहे. भारतीय संघाची पूर्ण फलंदाजीची फळी अपयशी होत असताना केवळ एकाच फलंदाजाला टार्गेट का केले जात आहे ? असा प्रश्नही या वेळी गंभीरने उपस्थित केला.
वरिष्ठ खेळाडू केव्हा निवृत्त होतील, हे त्यांच्यावर सोडून दिले पाहिजे. उगीचच निवृत्तीची चर्चा नको, असेही या वेळी भारताच्या या सलामीवीराने म्हटले. पर्थ कसोटी पूर्ण पाच दिवस चालली असती तर मंगळवारचा दिवस सामन्याचा पाचवा दिवस ठरला असता. मात्र, भारतीय संघ अडीच दिवसांतच पराभूत झाला. यामुळे भारतीय संघाला मंगळवारी येथे सरावाची संधी मिळाली. प्रशिक्षक डंकन फ्लेचरच्या उपस्थितीत भारतीय संघाने जवळपास तीन तास सराव केला.
नेटवर सरावानंतर पत्रकारांशी बोलताना गंभीर म्हणाला, लक्ष्मणसाठी एवढी चर्चा का होत आहे ? सर्वच फलंदाज अपयशी ठरत असताना केवळ एकालाच का टार्गेट केले जात आहे ? आम्ही सर्वच जण अपयशी ठरत आहोत. अशा परिस्थितीत एक ते सात क्रमांकाच्या
सर्वच फलंदाजांवर टीका व्हायला हवी. लक्ष्मण महान खेळाडू आहे. त्याने भारतासाठी प्रदीर्घ काळ सेवा दिली आहे. लक्ष्मणमुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. कोणत्या खेळाडूने केव्हा निवृत्त व्हावे ? याचा निर्णय त्या खेळाडूवरच सोडून दिला पाहिजे, असेही गंभीरने नमूद केले.
आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. आॅस्ट्रेलियात एकालाही शतक ठोकता आले नाही. हे आमच्या फलंदाजीतील दुबळेपण ठरले. आम्ही चांगला खेळ केला नाही, हे कटूसत्य आहे. भारतीय चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षेवर आम्ही खरे उतरलो नाही. नंबर वनचा संघ बनण्यासाठी आम्हाला देशाच्या बाहेरसुद्धा विजय मिळविण्यास सुरुवात करावी लागेल, असे गंभीरने सांगितले.
अ‍ॅडिलेड कसोटीत भारतीय संघ चांगली कामगिरी करील. आम्ही नेटस्वर कसून सराव करतोय, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला.
निवृत्तीच्या विचारात लक्ष्मण नाही
सुमार फॉर्माशी संघर्ष करीत असलो तरीही लक्ष्मणचा सध्या निवृत्तीचा विचार नाही, असे त्याच्या एका सहकाºयाने सांगितले. सध्या लक्ष्मण निवृत्तीचा विचारसुद्धा करायला तयार नाही. तो ज्यावेळी हा निर्णय घेईल, त्यापूर्वी बीसीसीआयसह सर्वांना सूचित केले जाईल, असेही या सहकाºयाने सांगितले. लक्ष्मणने आॅस्ट्रेलियातील तीन कसोटीच्या सहा डावांत 17 च्या सरासरीने अवघ्या 102 धावा काढल्यामुळे त्याच्या निवृत्तीची मागणी होऊ लागली आहे.