आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Leaked Photos Olympic Gymnast Mckayla Maroney Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवस्त्र छायाचित्रे पोर्न साइटवर झळकल्‍याने जिम्‍नॅस्टिकपटूने साइटवर ठोकला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो -ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्‍त केल्‍यानंतर मॅकायलाने राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अशा पद्धतीन आभार मानले.)
न्‍यूयॉर्क - अमेरिकेची जिम्‍नॅस्टिकपटू मॅकायला मोरोनीचे विवस्त्र छायाचित्रे पोर्न साइटवर झळकल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या मॅकायला हिने पोर्न साइटला कोर्टात खेचले आहे. मॅकायलाने संबंधित वेबसाइटला नोटीस पाठवून कथित छायाचित्रे काढून टाकण्‍यास सांगितले होते. पोर्न साइटने आपली चुक कबुल करत मॅकायलाचे छायाचित्रे साइटवरुन काढून टाकली आहेत.
मॅकायलासह अन्‍य शेकडो सेलिब्रेटीजची छायाचित्रे साइटवर प्रसिद्ध झाली होती. मॅकायला ही किशोरवयीन असतानाची छायाचित्रे पोर्न साइटवर प्रसिद्ध करण्‍यात आली होती. उल्‍लेखनिय म्‍हणजे मॅकायलाच्‍या चाहत्‍यांनी तीचे फोटो पोर्न साइटवरुन काढून टाकण्‍याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.
पत्र मिळताच हटविली छायाचित्रे
याविषयी पोर्न डॉट कॉम या साइटने सांगितले आहे की, 'मॅकायलाचे पत्र मिळताच आम्‍ही हे छायाचित्र काढून टाकले आहे.'
'ट्विटर'वर मानले आभार...
पोर्न साइटवरुन कथित छायाचित्रे काढून टाकल्‍यानंतर मॅकायलाने 'ट्वीट' करुन सर्व चाहत्‍यांचे आभार मानले आहे.

मॅकायलाचे विक्रम...
* ओलिम्पिक : टीम इव्हेंटमध्‍ये गोल्ड, वॉल्टमध्‍ये सिल्वर
* वर्ल्ड चॅम्पियनशिप-2011 व 2013 मध्‍ये तीन गोल्ड मेडल
* सिटी ऑफ जेसोलो ट्रॉफीमध्‍ये पाच गोल्ड मेडल
* पॅन अमेरिकन चॅम्पियनशिपमध्‍ये तीन गोल्ड मेडल
* P&G चॅम्पियनशिपमध्‍ये तीन गोल्ड मेडल आणि एक सिल्वर

पुढील स्‍लाइडवर पाहा, मॅकायलाची काही खास छायाचित्रे..