आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये पेसची विजयी सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताचा लिएंडर पेस आणि रादेक स्तेपानेकने मंगळवारी एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये आपल्या विजयी मोहिमेला दमदार विजयाने प्रारंभ केला. या जोडीने पुरुष दुहेरीच्या सलामी सामन्यात दुसर्‍या मानांकित अलेक्झेंडार पेया आणि ब्रुनो सोआरेसला पराभूत केले. सातव्या मानांकित पेस-स्तेपानेकने 6-3, 5-7, 10-8 अशा फरकाने सामना जिंकला. या जोडीने एक तास 42 मिनिटांच्या रंगतदार लढतीत विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. आता या जोडीचा ब गटात सामना डेव्हिड मारोओ आणि फर्नांडो वर्दास्कोशी होईल.

अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेत्रो आणि स्वीसच्या स्टानिस्लास वावरिकाने स्पर्धेत आगेकूच केली. चौथ्या मानांकित डेल पेत्रोने पुरुष एकेरीच्या सामन्यात आठव्या मानांकित रिचर्ड गास्केटला 6-7, 6-3, 7-5 ने पराभूत केले. त्याने ब गटात हा सामना जिंकला. दुसरीकडे सातव्या मानांकित वावरिकाने पाचव्या मानांकित टॉमस बर्डिचवर 6-3, 6-7, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला.