बंगळुरू - जगविख्यात फुटबॉलपटू पेले आणि महान बॉक्सिंगपटू मोहंमद अली यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या खेळात सर्वोच्च स्थानी असताना खेळाला अलविदा केला त्याप्रमाणेच मलादेखील टेनिसला अलविदा करायला आवडेल, असे भारतीय टेनिस स्टार
लिएंडर पेसने म्हटले आहे.
२०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास तशी संधी मला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रिओमध्ये पदक मिळवण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेत असल्याचेही त्याने नमूद केले. पेलेबरोबरच मायकल जॉर्डन, कार्ल लुइस, रॉड लेव्हर यांनीदेखील तीच परंपरा निर्माण केली असून
तिचे अनुकरण करायला मला आवडेल, असेही या वेळी िलएंडर पेस म्हणाला.