आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leander Paes News In Marathi, World Tennis Ranking, Divya Marathi

जागतिक टेनिस क्रमवारी: लिएंडर पेस दुहेरीच्या टॉप-10 मधून बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा स्टार लिएंडर पेसची जागतिक टेनिस क्रमवारीत मोठी घसरण झाली. तो पुरुष दुहेरीच्या टॉप-1-0 मधून बाहेर पडला आहे. सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील निराशाजनक खेळीचा फटका त्याला क्रमवारीत बसला. त्याला आपला सहकारी रांदेक स्तेपानेकसोबत स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच त्याची 11 व्या स्थानावर घसरण झाली. तसेच भारताचा एकेरीचा नंबर वन टेनिसपटू सोमदेव देववर्मनने करिअरमधील सर्वोत्कृष्ट 143 व्या स्थानी धडक मारली. युकी भांबरीने 151 वे स्थान गाठले.

सानिया पाचव्या स्थानी
सानियाने डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या क्रमवारीतील पाचवे स्थान कायम ठेवले. मात्र, भारताची युवा खेळाडू अंकिता रैनाला मोठा फटका बसला. तिची पाचव्या स्थानावर घसरण झाली. तिने 281 वे स्थान गाठले.