आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लियांडर पेस टॉप 10 मधून आऊट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा सोमदेव देववर्मन, सनमसिंग आणि भारतीय वंशाचा अमेरिकन खेळाडू प्रकाश अमृतराज यांनी एटीपी एकेच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. दुहेरीत लियांडर पेस पाच स्थानांच्या घसरणीसह टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. पेसची पाच स्थानांवर घसरण झाली. तो आता 13 व्या क्रमांकावर आला आहे. महेश भूपती एका स्थानाने पडून दहाव्या क्रमांकावर, तर रोहन बोपन्ना 12 व्या क्रमांकावर आहेत. महिला गटात सानिया मिर्झाच्या क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा झाली असून, ती आता 17 व्या स्थानी आहे.