आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिएंडर पेसने ४१ व्या वर्षी जिंकले १५ वे ग्रँडस्लॅम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेसने आपल्या टेनिस करिअरमध्ये १५ वा ग्रँडस्लॅम किताब पटकावला. पेसने रविवारी स्विसच्या मार्टिना हिंगीससोबत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. तसेच त्याचा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचा हा तिसरा किताब ठरला.

भारताचा ४१ वर्षीय लिएंडर पेस व मार्टिनाने अंतिम सामन्यात डॅनियल नेस्टर व क्रिस्टिनाचा पराभव केला. या सातव्या मानांकित जोडीने ६२ मिनिटांत ६-४, ६-३ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. सरळ दोन सेटवरील एकतर्फी विजयासह पेस-मार्टिना हिंगीसने अजिंक्यपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यातील पराभवाने नेस्टर आणि क्रिस्टिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दोन वेळा निवृत्तीची घोषणा करूनही टेनिस कोर्टवर परतलेल्या मार्टिना हिंगीसने दुहेरीच्या तिसर्‍या विजेतेपदावर नाव कोरले. तिने एकेरीत पाच जेतेपद पटकावले.

पंतप्रधानांच्या शुभेच्छा !
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचा किताब विजेत्या लिएंडर पेसचे खास अभिनंदन केले. त्यांनी टि्वट करून या शुभेच्छा दिल्या.