आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Leaving Out Sehwag, Yuvraj Was A Blunder: Abdul Qadir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेहवाग, युवी नसल्याने पाक खेळाडूला चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणार्‍या सामन्याला "फायनलपूर्वीचे फायनल' असे नाव देताना अनुभवी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग भारतीय संघात नसल्याने मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे माजी लेगस्पिनर अब्दुल कदीर यांनी व्यक्त केली.

सेमीफायनलमध्ये एकच आशियाई संघ पोहोचेल. या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. भारत पाक संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र, सेहवाग युवी नसल्याने मी निराश झालो, असे कदीर म्हणाले.
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ गटात आहेत. दोघांचा पहिला सामना अॅडिलेड येथे १५ फेब्रुवारी रोजी होईल. एका मुलाखतीत कदीर म्हणाले, "माझ्या मते, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिकेचे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आशियातून मात्र फक्त एकच संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकेल.

"भारताकडे घातक वेगवान गोलंदाज नाहीत. त्यांची ताकद फिरकी गोलंदाजी आहे. चावला, अमित मिश्रासारखे लेगस्पिनर भारतीय संघात असते तर त्यांची टीम अधिक मजबूत असती. धोनी स्वत: सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे. मात्र, त्याला इतर दहा खेळाडूंकडूनही मदत मिळाली पाहिजे. तिरंगी मालिकेत कोहली, धवन, रैना, रहाणे हे चुकीचे फटके मारून बाद झाले. हे मॅचविनर खेळाडू आहेत.