आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेडेकीचा रचला इतिहास; फ्रँकलिनची विक्रमाशी बरोबरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना - जागतिक जलतरण स्पर्धेतील 16 वा दिवस अमेरिकेच्या मिसी फ्रँकलिन आणि कैटी लेडेकीच्या नावे राहिला. 16 वर्षीय लेडेकीने 800 मीटर फ्री स्टाइलमध्ये नवा विश्वविक्रम केला. दुसरीकडे फँकलिनने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना एकाच स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

फ्रँकलिनचे पाच सुवर्ण
फ्रँकलिनने 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 2 मिनिट 04.76 सेकंदात सुवर्णपदक पटकावले. तिचे हे स्पर्धेतील पाचवे सुवर्ण ठरले. यासह तिने अमेरिकेच्या ट्रेसी कोलकिसच्या 1970 आणि ऑस्ट्रेलियाच्या लिबी ट्रिकेटच्या 2007 मधील एकाच स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. फ्रँकलिनने यापूर्वी 100 मीटर बॅकस्ट्रोक, 200 मीटर फ्री स्टाइल, 4 गुण 100 आणि 4 गुण 200 मीटर रिलेत सुवर्णपदक मिळवले. आता तिच्या नावे आठ सुवर्णसह दहा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक आहेत.

अमेरिका अव्वलस्थानी
जागतिक जलतरण स्पर्धेत आता अमेरिकेने 14 सुवर्णसह 29 पदकांची कमाई करून अव्वलस्थान गाठले. या संघाने आतापर्यंत आठ रौप्य आणि सात कांस्यपदक जिंकले. अमेरिकेने चीनला धक्का देऊन अव्वल स्थान गाठले. चीनने 25 पदकांसह दुसरे स्थान गाठले. यामध्ये 13 सुवर्णपदकांचा समावेश आहे. रशियाने 18 पदकांची कमाई केली.


रेबेकाचा विक्रम मोडला
लेडेकीने 800 मीटर फ्री स्टाइलमध्ये 8 मिनिट 13.86 सेकंदांसह नवा विक्रम केला. तिने इंग्लंडच्या रेबेका एडलिंगटनचा 8 मिनिट 14.10 सेकंदांचा विक्रम ब्रेक केला. डेन्मार्कच्या लोटे प्रिसने रौप्य आणि न्यूझीलंडच्या लौरेन बोएलने कांस्यपदक पटकावले. लेडेकीने 1500 आणि 400 मीटर फ्री स्टाइलमध्येही सुवर्ण जिंकले आहे.