आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोपिंग प्रकरणी ली चोंगवर दोन वर्षांची बंदी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ली चोंग वेईचे संग्रहित छायाचित्र.
क्वालालंपूर - मलेशियाचा जगविख्यात बॅडमिंटनपटू एका चाचणीत दोषी आढळून आल्याने त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ मलेशियाने खेळाडूचे नाव जाहीर केले नसले तरी ते नाव ली चोंग वेईचे असण्याची शक्यतादेखील नाकारलेली नाही. त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली जाऊ शकते.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ मलेशियाचे उपाध्यक्ष नोरझा झकारिया यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. त्याच्या बी सॅम्पलमध्ये दोष आढळून आला आहे. दरम्यान ली हा दुस-या चाचणीसाठी नॉर्वेला गेला आहे. चाचणीतील काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्याने खेळाडूचे नाव जाहीर करण्यास नोरझा यांनी असमर्थता दर्शवली.

ली चोंग वेईच्या चाहत्यांना धक्का
लीबाबतच्या चर्चेला बाहेर प्रारंभ होताच त्याच्या चाहत्यांना या वृत्ताने धक्काच बसला आहे. याबाबत बोलताना नोरझा यांनी संबंधित खेळाडू हा खूप परिश्रम घेणारा असून त्याने कारकीर्दीत कधीच शॉर्टकट वापरलेले नसल्याचेही सांगितले. या खेळाडूच्या मांडीला दुखापत झाल्याने त्याला जुलै महिन्यात विशेष ट्रीटमेंट घ्यावी लागली होती. त्या उपचारांदरम्यान काही प्रकार झाला असावा का, त्याचाही विचार केला जाणार आहे. तसेच या खेळाडूने देशाला बॅडमिंटनमध्ये प्रचंड नाव कमावून दिले आहे. तो या प्रकाराने प्रचंड तणावात असून त्याला देशवासीयांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.