आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : रक्‍तबंबाळ अवस्थे‍तही महिला बॉक्सरने दिली झुंज , पाहा छायाचित्रे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: फाइटदरम्‍यान लेस्ली रक्‍तबंबाळ अवस्‍थेत.
मॅक्सिको (सिटी)- जिंकण्‍यासाठी खेळाडू जीवाचे रान करतात. अगदी प्राणपणाने लढत असतात. याचा प्रत्‍येय यूएफसी (अल्टीमेट फाइटिंग चॅम्पियनशिप)मध्‍ये आला. UFC-180 च्‍या महिला गटातील लढतीमध्‍ये लेस्ली स्मिथचा कान तूटला. तरीही ती मागे हटायला तयार नव्‍हती.
UFC-180 च्‍या महिला गटात लेस्‍ली स्मिथ आणि जेसिका आय यांची लढत सुरु होती. जेसिकाच्‍या जोरदार पंचमुळे लेस्‍लीचा कान चिरला. त्‍यातून भळाभळा रक्‍त वाहायला लागले होते. परंतु लेस्‍ली रिंग सोडायला तयार नव्‍हती. डॉक्‍टरांनी तिला मोठ्या मुश्किलने मेडिकल ट्रिटमेंटसाठी रिंग सोडायला सांगितले.
कानाला पट्टी बांधून लेस्‍ली पुन्‍हा रिंगमध्‍ये मैदानात आली. तिला पाहताच पंच आणि प्रेक्षकही आश्‍चर्यचकित झाले. लढत पुन्‍हा सुरु झाल्‍यानंतर तिच्‍या कानातून अजूनच रक्‍त वाहायला लागल्‍यावर पंचांनी सामना थांबविला. परंतु लेस्‍ली थांबायला तयार नव्‍हती अशावेळी जबरदस्‍तीने पंचांनी सामना समाप्‍तीची घोषणा करत जेसिकाला विजयी घोषित केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो आणि अंतीम स्‍लाइडवर VIDEO