आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Less Possibility For Indian Olympic Committee For Olympic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता कमी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आपापल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्यामुळे रविवारी नवी दिल्ली येथे होणा-या आयओएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर भारताच्या ऑलिम्पिक चळवळीतील पुनरागमनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता कमी आहे. आयओसीने ऑलिम्पिक चळवळीचे पावित्र्य राखण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोप असणा-या पदाधिका-यांना आयओएमध्ये निर्बंध घालण्याच्या दृष्टीने घटनेत बदल करा, असे सुचवले आहे. मात्र, अशा प्रकारचा घटनाबदल भारतीय राज्यघटनेला अनुसरून नसल्यामुळे तसा करता येणार नाही, असा पवित्रा आयओएने घेतला आहे.

त्यामुळे उद्या दिल्लीत होणा-या ‘आयओए’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे आयओसीने सुचवलेला घटनाबदल कसा करायचा, हा प्रश्न आहे. जोपर्यंत आयओसीला अपेक्षित असलेला घटनाबदल आयओए करणार नाही तोपर्यंत भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे आयओएची दिल्लीतील बैठक केवळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.

बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवणार, हादेखील एक गहन प्रश्न आहे. याबद्दल अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे. 5 डिसेंबर रोजी झालेल्या आयओएच्या निवडणुकांमध्ये अभयसिंग चौटाला अध्यक्ष, तर ललित भानोत सचिवपदी निवडून आले होते. या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आयओएच्या सभेचे अध्यक्षपद माजी हंगामी आयओए अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा भूषवणार असले तरीही दिल्लीत चर्चा आहे. कायाकिंग व कॅनोइंग असोसिएशनचे अध्यक्ष एस. रघुनाथन यांच्याकडे उद्याच्या बैठकीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात येतील, असाही सूर व्यक्त होत आहे.

आयओएला निलंबन रद्द करण्यात रस नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयओएला सध्या निलंबन रद्द करण्यात फारसा रस नाही. कारण येत्या 7 सप्टेंबर रोजी ब्युनोस आयर्स येथील आयओसीच्या बैठकीत जॅक रॉग्ज यांच्या जागी नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. आयओसीचे नवे अध्यक्ष आयओएची अडचण रॉग्ज यांच्यापेक्षा अधिक विचारपूर्वकरीत्या समजावून घेतील, अशी आशा आयओएला आहे. त्यामुळे 7 सप्टेंबरनंतर आयओएच्या पुनरागमन प्रक्रियेला आयओएकडून वेग येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.