आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 व्या वर्षीच प्रेमात पडला होता संगकारा, स्कूल Bunk करून जायचा भेटायला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यॉटवर सुटीचा आनंद घेताना संगकारा आणि येहाली. - Divya Marathi
यॉटवर सुटीचा आनंद घेताना संगकारा आणि येहाली.
स्पोटर्स डेस्क- श्रीलंकेचा महान खेळाडू राहिलेल्या कुमार संगकाराचा आज बर्थ डे आहे. संगकाराने गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. 39 वर्षांचा संगकारा निवृत्तीनंतर पूर्णवेळ कुटुंबाला देत आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते, की क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा इतरांना काही फायदा होईल असे काही करायला मला आवडेल. 17 वर्षाचा असताना पडला प्रेमात....
- संगकाराच्या पत्नीचे नाव येहाली आहे. या जोडप्याने 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केले होते.
- त्यांना जुळे झाले आहे. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
- येहालीसोबत संगकाराची भेट झाली तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता.
- तेव्हा संगकारा येहालीला भेटायला शाळा बुडवून येहालीला भेटायला कोलंबो या शहरात जायचा.
- तेव्हापासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. आज त्यांच्या नात्याला 20 वर्षाचा काळ लोटला आहे.
पत्नीचे लीक झाले होते पर्सनल फोटोज्-
- नोव्हेबर 2013 मध्ये संगाराची पत्नी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आली होती.
- तिचे काही पर्सनल फोटोज इंटरनेटवर लिक झाले होते. त्यात ती पिंक कलरच्या रिव्हिलिंग नाइट ड्रेसमध्ये दिसत होती.
- या फोटोत तिच्यासोबत श्रीलंकेच्या क्रिकेटर्सच्या पत्नी देखली होती.
किस मुळेही आली होती चर्चेत
- 2014 मध्ये श्रीलंकेने आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा संगकाराने नाबाद 52 धावांची तडाखेबंद खेळी केली होती.
- श्रीलंकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर विजयोत्सवात संगकाराने सर्वांसमोर पत्नीला किस केले होते.
- भारताविरोधातील हा सामना बांगलादेशात खेळाला गेला होता. तेव्हा संगकाराच्या खेळापेक्षा या 'किस'ची चर्चा अधिक झाली होती.
- एका मुलाखतीत या किस प्रकरणावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला होता, की आम्ही विजयाची आतुरतेने वाट पाहात होता आणि जेव्हा विजय मिळाला तेव्हा त्याचा आनंद साजरा केला.
- तर, त्याची पत्नी म्हणली होती, 'आम्ही एक्सायटेड झालो होतो, आम्हाला कळालेही नाही आणि ते होऊन गेले. त्यानंतर मला अवघडल्यासारखे झाले होते.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संगकाराची पत्नी आणि कुटुंबीयांचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...