आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या, आज सचिनच्या शतकासाठी प्रार्थना करू या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर गुरुवारी नाबाद राहत जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. कारण मास्टर ब्लास्टरची फलंदाजी बघण्याची त्यांना सलग दोन दिवस संधी मिळेल. रात्री सचिनचा चाहता हीच प्रार्थना करत झोपला असेल की त्याने शुक्रवारी शतक झळकवावे. त्यांचा आवडता हिरो त्याच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकून हा दिवस यादगार बनवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. तुम्हीही जर सचिनच्या शतकासाठी प्रार्थना करत असाल तर दैनिक भास्करच्या ‘इंडिया सॅल्यूटस सचिन’ मोहिमेत सामील होऊन या क्षणाला अविस्मरणीय बनवू शकता. या अभियानाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सॅल्यूट आणि संदेश सचिनपर्यंत पोहोचवू शकता.
तुमचा सॅल्यूट सचिनपर्यंत पोहोचविण्यासाठी दैनिक भास्करद्वारा तयार करण्यात आलेल्या www.facebook.com/Indiasalutessachin या फेसबुक पेजवर लाइक करू शकता किंवा 08082000222 वर मिस कॉलसुद्धा देऊ शकता. तुमचा एक लाइक किंवा मिस कॉल एका सॅल्यूट सारखा असेल. याव्यतिरिक्त तुम्ही सचिनविषयी एखादा संदेश किंवा घोषवाक्य पाठवू इच्छित असाल तर वर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ऊइरर लिहून एसएमएसद्वारेसुद्धा पाठवू शकता.