आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liam Made New World Record For Most Runs In One Day

लियामचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - युवा फलंदाज लियाम लिविंगस्टाेनने वनडेच्या इतिहासात नव्या विक्रमाची नाेंद अापल्या नावे केली. त्याने देदीप्यमान कामगिरी करताना वनडेत सर्वाधिक धावांचा नवा विक्रम केला. लँकेशायरच्या या युवा फलंदाजाने १३८ चेंडंूचा सामना करताना सर्वाधिक ३५० धावा काढल्या. यात ३४ चाैकार अाणि २७ षटकारांचा समावेश अाहे. ही कामगिरी करणाऱ्या लियामने हैदराबादच्या निखिल सुरेंद्रनच्या नावे असलेला नाबाद ३३४ धावांचा विक्रमही ब्रेक केला.

२१ वर्षीय लिविंगस्टाेनने राॅयल लंडन नॅशनल क्लब क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये नांतविच संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाकडून झंझावाती फलंदाजी करताना त्याने सामन्यात कॅल्डीविरुद्ध नव्या विक्रमाला गवसणी घातली.

इंग्लंड अॅँड वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) अापल्या संकेतस्थळावरून ही माहिती दिली. वनडे क्रिकेटमधील ही सर्वात माेठी खेळी ठरली. लियामने याशिवाय हैदराबादच्या सुरेंद्रनलाही मागे टाकले.

नांतविचने लियामच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर ४५ षटकांत सात गड्यांच्या माेबदल्यात ५७९ धावांचा डाेंगर रचला. याशिवाय टीमने धावसंख्येच्या विक्रमालाही गवसणी घातली.
७९ धावांत खुर्दा
प्रत्युत्तरात कॅल्डी टीमने ७९ धावांत गाशा गुंडाळला. या टीमचा खडतर अाव्हानाच्या प्रत्युत्तरात धुळदाण उडाली. संघातील काेणत्याही फलंदाजांला सामन्यात समाधानकारक अशी खेळी करता अाली नाही.
३ बळी घेतले
लियाम लिविंगस्टाेनने तीन झेल घेऊन सामना अविस्मरणीय केला. लिविंगस्टाेनने गतवर्षी मँचेस्टर येथे भारताविरुद्ध कसाेटीत ब्राॅडच्या जागी प्रतिनिधित्व केले हाेते.
खेळीचे विश्लेषण
१३८ - चेंडू, ३५० - धावा , ३४ चाैकार , २७ षटकार , ५२ धावा पळून काढल्या, ३३४
नाबाद धावांचा निखिलचा विक्रम ब्रेक