आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टने बैठक थांबवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयने तत्परतेने विशेष बैठक बोलावून मोदींवर आजीवन बंदीचा निर्णय घेतला. या बंदीमुळे ललित मोदींना भारतीय क्रिकेट संघटनेचे कोणतेही पद भुषवता येणार नाही.
तत्पूर्वी, दिल्ली हायकोर्टने या बैठकीवरील बंदी उठवली होती. त्यानंतर मोदींवर आजीवन बंदी घालण्यासाठी चेन्नईमध्ये बीसीसीआयची बैठक बोलवण्यात आली. मोदींवर बंदी घालण्याचा निर्णय हा बीसीसीआयच्या शोध समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे घेण्यात आला आहे.
दिल्ली हायकोर्टाने बीसीसीआयला आयपीएलमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या आरोपांबाबत बैठक बोलावण्याची परवानगी दिली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.