आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lin Dan Wins Record Fifth Badminton World Championship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप : लीन डॅन, इंतानोन चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांगझू - ऑलिम्पिक चॅम्पियन लीन डॅनने विश्व बॅडमिंटनमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्याने रविवारी सलग दुसर्‍यांदा आणि एकूण सहाव्या वेळी विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले. महिला एकेरीत थायलंडच्या रत्नाचोक इंतानोन चॅम्पियन ठरली.

चॅम्पियनशिपचे सर्व फायनल रविवारी झाले. पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये मागच्या प्रमाणे लीन डॅन आणि अव्वल मानांकित ली चोंग वेई यांच्यात झुंज रंगली. सामना एक तास आणि 34 मिनिटे रंगला. मात्र, मलेशियाचा ली चोंग वेई अखेरच्या काही मिनिटांत रिटायर झाला. त्यामुळे लीन डॅनने 16-21, 21-13, 20-17 अशा स्कोअरसह पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले. लीनने मलेशियाच्या खेळाडूविरुद्ध 31 सामन्यांत 22 वा विजय मिळवला.

इंडोनेशियाला दोन पदके
इंडोनेशियाने पुरुष दुहेरी आणि मिर्श दुहेरीचे विजेतेपद जिंकले. मोहंमद एहसान-हेंद्रा सेतियावान या जोडीने पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये डेन्मार्कचा मठियास बोई आणि कार्सटन मोगेनसेनला 21-13, 23-21 ने पराभूत केले. मिर्श दुहेरीत सोना तोंतोवी अहेमद आणि लिलियाना नात्सीर यांनी बाजी मारली.

तिसरी मानांकित इंडोनेशियन जोडीने चीनच्या चेन जू आणि जिन मा यांना 21-13, 16-21, 22-20 ने हरवले. महिला दुहेरीत चीनची जियाओली वांग आणि यांग यूने बाजी मारली. चीनच्या या अव्वल मानांकित जोडीने फायनलमध्ये हाए वोन इओम आणि यी ना जांग या कोरियन जोडीला 21-14, 18-21, 21-8 ने मात दिली. या लढतीत कोरियाच्या जोडीने दुसर्‍या गेममध्ये दमदार पुनरागमन केले. मात्र, तिसर्‍या व निर्णायक गेममध्ये त्याचा फार काळ निभाव लागला नाही.