आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lionel Messi Nets A Hat trick As Barcelona Beat 10 man Real Madrid 4 3

मेसीची हॅट्ट्रिक; बार्सिलोना विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - स्टार खेळाडू लियोनेल मेसीने (42, 65, 84 मि.) गोलची हॅट्ट्रिक करून बार्सलिोनाला ला फुटबॉल लीगमध्ये रोमांचक लढतीत विजय मिळवून दिला. या टीमने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यजमान रिअल माद्रिदला घरच्या मैदानावर 4-3 अशा फरकाने पराभूत केले. आंद्रे इनेस्टाने (7 मि.) बार्सिलोनाच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. या विजयासह बार्सलिोनाने गुणतालिकेत तिसर्‍या स्थानी झेप घेतली. मेसीच्या टीमचा लीगमधील हा 22 वा विजय ठरला.

घरच्या मैदानावरील लाजिरवाण्या पराभवामुळे रिअल माद्रिदची गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी घसरण झाली. या टीमला तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. या टीमसाठी करीम बेंझेमा (20, 24 मि.), क्रिस्टियानो रोनाल्डोने (55 मि.) यांनी गोल केले. मात्र, त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही. आंद्रे इनेस्टाने गोल करून बार्सिलोनाला दमदार सुरुवात करून दिली होती.

अँथलेटिको माद्रिद अव्वलस्थानी
अँथलेटिको माद्रिदने गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. या टीमने लढतीत रिअल बेटिसवर 2-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. गाबी (58 मि.) आणि डियागो कोस्टा (64 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर अँथलेटिको माद्रिदने सामना जिंकला. यासह या टीमने गुणतालिकेत 70 गुणांसह अव्वल स्थान गाठले.