लियोनेल मेसीची विक्रम / लियोनेल मेसीची विक्रम चौथ्यांदा ‘फिफा प्लेयर ऑफ इयर’ पुरस्कारासाठी निवड

वृत्तसंस्था

Jan 09,2013 06:03:00 AM IST

झुरिच - स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसीची विक्रमी चौथ्यांदा ‘फिफा प्लेयर ऑफ इयर’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग चार वेळा हा पुरस्कार जिंकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.


मूळ अर्जेंटिनाचा खेळाडू असलेल्या मेसीने 2012 मध्ये बार्सिलोना क्लबकडून विक्रमी 91 गोल केले. हे थरारक प्रदर्शन त्याच्या किताबी विजयासाठी निर्णायक ठरले. 2012 च्या सर्वश्रेष्ठ खेळाडू पुरस्कारासाठी हॉलंडचा आंद्रेस इनिस्ता, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोसुद्धा शर्यतीत होते. मात्र, 25 वर्षीय मेसीने बाजी मारली. त्याला सर्वाधिक 41.60 टक्के मते मिळाली. रियल माद्रिदच्या रोनाल्डोला 23.68 आणि बार्सिलोनाच्या इनिस्ताला 10.91 टक्के मते मिळाली.

आपलाच विक्रम दुरुस्त केला
यापूर्वी फ्रान्सचा मायकेल प्लातिनी आणि मेसीच्या नावे सलगपणे तीन वेळा ‘फिफा प्लेयर ऑफ इयर’ पुरस्कार जिंकण्याचा संयुक्त विक्रम होता. मेसीने चौथ्यांदा हा पुरस्कार जिंकून आपल्याच विक्रमात सुधारणा केली.

बोस्क ठरले सर्वश्रेष्ठ कोच
स्पेनचे विसेंट डेल बोस्क यांना 2012 तील सर्वश्रेष्ठ कोच म्हणून निवडण्यात आले. या पुरस्काराच्या शर्यतीत रियल माद्रिदचे जोस मोरिन्हो आणि बार्सिलोनाचे माजी कोच जोसेफ गार्डियोलो हेसुद्धा होते. या दोघांना मागे टाकून त्यांनी बाजी मारली. प्लेयर प्ले पुरस्कार उझबेकिस्तान फुटबॉल महासंघाला मिळाला.

पेले, मॅरेडोनासोबत तुलना नाही
लियोनल मेसीच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. मात्र, त्याच्या उपस्थितीत अर्जेंटिनाच्या टीमला एकही मोठे यश मिळालेले नाही. मेसीच्या उपस्थितीत अर्जेंटिनाची टीम जोपर्यंत मोठे यश मिळवत नाही, तोपर्यंत त्याची तुलना महान पेले आणि डिएगो मॅरेडोनासोबत होऊ शकत नाही, असे फुटबॉल तज्ज्ञांचे मत आहे. अर्जेंटिनाच्या चाहत्यांना आता विश्वचषक विजयाची प्रतीक्षा आहे.

सहका-यांसोबत पुरस्कार वाटण्याची इच्छा
हा पुरस्कार पुन्हा एकदा जिंकल्यामुळे निश्चितपणे आनंद होत आहे. हा खास पुरस्कार आहे. हा पुरस्कार मी बार्सिलोनाचे माझे सहकारी विशेषत: आंदे्रससोबत वाटू इच्छितो. अर्जेंटिनाच्या माझ्या सहकारी खेळाडूंनासुद्धा मी विसरलेलो नाही. यापुढेही मी असाच खेळत राहिल. मला ज्यांनी मत दिले, त्या सर्व कर्णधार आणि प्रशिक्षकांचा मी ऋणी आहे. धन्यवाद.
लियोनेल मेसी, पुरस्कार जिंकल्यानंतर

X
COMMENT