आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थालेकरची निवृत्तीची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - पुण्यात जन्म झालेली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थालेकरने आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्‍ट्री य क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता मी महिला क्रिकेटचा विकास अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न करेल, असे स्थालेकरने म्हटले. वर्ल्डकप फायनलचा सामना स्थालेकरचा 125 वा वनडे सामना होता. या खेळात एक हजार धावा आणि 100 विकेट घेणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने 125 वनडे सामन्यांत 30.65 च्या सरासरीने 2728 धावा काढल्या. तसेच 24.97 च्या सरासरीने 146 विकेटही तिने घेतल्या. तिने वनडेत दोन शतके आणि 16 अर्धशतके झळकावली.