आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नवोदित खेळाडूने IPL मध्ये लावली होती पहिली इंडियन सेन्चुरी, ही आहे संपूर्ण लिस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएच म्हणजे रोमांचक क्रिकेट. यावेळी मैदानावर अनेक रेकॉर्ड घडवले जातात तर अनेक तुटतात. काही दिग्ग्ज खेळाडू फ्लॉप ठरतात तर काही नवीन सुरमांचा उदय होतो. लिलावात अगदी शुल्लक रकमेला विकत घेण्यात आलेले खेळाडू महागड्या खेळाडूंवर भारी पडतात. काहीसे असेच घडले होते. आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात. मोठमोठे सुरमा मैदानावर असताना अगदी नवीन असलेल्या मनीष पांडे याने रॉयल चॅलेंजर बंगळुरुसाठी डेक्कन चार्जरविरुद्ध खेळताना तुफानी शतक झळकावले. आयपीएल इतिहासातील सर्वात चर्चा झालेल्या शतकांमध्ये याचा समावेश होतो. यासह मनीष आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला.
दिग्गज करु शकले नाही ही कामगिरी
क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सिक्सर किंग युवराजसिंग, मुल्तानचा सुल्तान वीरेंद्र सेहवाग, कॅप्टन दी ग्रेट सौरव गांगुली यांच्यासह अनेक दिग्गज आयपीएलच्या पहिल्या मोसमात सहभागी होते. यावेळी मनीष पांडे अगदी अनोळखी होते. मात्र त्याने पहिले शतक मारुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मनीषने असा केला धमाका
आयपीएलच्या पहिल्या मोसमात कोणत्याही भारतीय खेळाडूने शतक झळकावले नाही. परंतु, दुसऱ्या मोसमात मनीष पांडेने धमाकेदार 114 धावा काढल्या. यासह तो पहिला भारतीय शतकवीर ठरला. 21 मे 2009 रोजी झालेल्या या सामन्यात आरसीबी 12 धावांनी जिंकले होते. यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. त्याला अनेक ऑफर मिळत गेले. पण त्यानंतर तो शतक झळकावू शकला नाही.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या कोणकोणत्या भारतीय खेळाडूंनी आयपीएचमध्ये झळकावले शतक...