आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE 1st Test Ind Vs Aus Latest Score In Marathi

1st Test : चांगली सुरुवात करुन घसरले कांगारु, शेवटच्या सत्रात गमावल्या 4 विकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - येथील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस रोमांचक राहिला. पहिल्या दोन सत्रात यजमान ऑस्ट्रेलियाने भरपूर रन्स केले, मात्र टी-टाइमनंतर त्यांनी चार विकेट गमावल्या. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावत 354 रन्स केले. स्टिव्हन स्मिथ 72 रन्सवर नाबाद राहिला.

करणच्या फिरकीची कमाल
मुरली विजयने दिलेल्या जीवदानाचा फायदा वॉर्नरला घेता आला नाही. कारकिर्दीतील पहिली कसोटी खेळत असलेल्या करण शर्माने शतकवीर वॉर्नरची विकेट घेऊन भारताला मोठे यश मिळवून दिले. वॉर्नर कारकिर्दीत दुसर्‍यांदा 150 चा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ होता. करणच्या फिरकीने त्याला फसवले आणि तो मिडविकेटकडे खेळताना इशांतकडे झेल देऊन बाद झाला. वॉर्नरने 19 चौकारांसह 145 रन्स केले.
मुरलीने दिले होते जीवदान
51 व्या ओव्हरमध्ये वॉर्नरला बाद करण्याची संधी मुरली विजयला मिळाली होती. मात्र ती त्याने गमावली. शतक पूर्ण केलेल्या डेव्हिड वॉर्नरने मिडविकेटकडे शॉट खेळला होता. त्याने त्याचा सहकारी स्मिथला रन घेण्यासाठी बोलावले, मात्र तो क्रिजच्या बाहेर निघाला नाही. त्यावेळी मुरलीला त्याला रनआऊट करण्याची संधी होती. मात्र, ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे ती त्याने गमावली.
कर्णधार क्लार्क जायबंदी
इशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलिया कर्णधार मायकेल क्लार्क रिटायर्ड हर्ट झाला. शॉर्ट पिच चेंडूपासून वाचण्यासाठी तो मागे सरकला. त्याला चेंडू लागला नाही, मात्र त्याचे पाठीचे दुखणे बळावले. क्लार्कने तत्काळ फिजिओला बोलावून घेतले. त्याने खेळण्यास असमर्थता दर्शवली आणि रिटायर्ड हर्ट होऊन 60 धावांवर तंबूत परतला. याआधीही मायकेल पाठदुखीमुळे संघातून बाहेर होता.
वॉर्नरने शानादर फलंदाजी करत शतक पूर्ण केले. त्याने कसोटी पदार्पण करणार्‍या करण शर्माच्या गोलंदाजीवर एक रन घेऊन करिअरमधील 10 वे कसोटी शतक पूर्ण केले.
भारताच्या वरुण आरोनने शेन वॉटसनची विकेट घेऊन भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याच्या आऊटस्विंग होणार्‍या चेंडूवर वॉटसनला चूक करण्यास भाग पाडले आणि धवनने सोपा झेल टीपला. वॉटसन 14 रन्सवर आऊट झाला. त्याने दुसर्‍या विकेटसाठी वॉर्नरसोबत 38 रन्सची भागीदारी केली.
वॉर्नरचे अर्धशतक
ओपनर डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत 45 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आरोनच्या षटकात चौकार लगावत 50 रन्स पूर्ण केले.
पहिली विकेट
इशांत शर्माने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने ओपनर क्रिस रॉजर्सला बाद केले. सामन्याच्या 8 व्या ओव्हरमध्ये इशांतचा बाहेर जाणारा चेंडूने रॉजर्सच्या बॅटच्या किनार्‍याला स्पर्षकेला आणि स्लिपमध्ये असलेला शिखर धवनने कोणतीही चूक न करता हातात आलेला चेंडू अलगद टिपला. रॉजर्स 9 रन्सवर बाद झाला.
नाणेफेक -
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाकडून करण शर्मा पदार्पण करत आहे. महेंद्रसिंह धोनीने करणला टेस्ट कॅप दिली.
ऑस्ट्रेलियाने दिवंगत फिलिप ह्यूजचे नाव 13 वा खेळाडू म्हणून संघात ठेवले आहे. 27 नोव्हेंबर रोजी ह्यूजचे निधन झाले. त्याच्या डोक्यावर चेंडू लागल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), क्रिस रॉजर्स, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल मार्श, ब्रेड हॅडिन, मिशेल जॉन्सन, रेयान हॅरिस, पीटर सिडल आणि नॅथन लॉयन.

भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, करण शर्मा, मोहंमद शमी, वरुण अॅरोन आणि ईशांत शर्मा.
काळी पट्टी बांधली
दिवंगत फिलिप ह्यूजला श्रद्धांजली देण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतावेळी त्यांच्या हातांवर काळी पट्टी बांधलेली होती.

फोटो - फलंदाजी करतान स्टिव्हन स्मिथ
पुढाली स्लाइडमध्ये पाहा, अॅडलेड टेस्टची लाइव्ह छायाचित्रे