आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5th Test 3nd Day: England Vs India At The Oval, Aug 15 19, 2014

टीम इंडिया 143 मिनिटांत ऑल आऊट, इंग्लंडविरुद्ध 40 वर्षांतील मोठा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओव्हल - भारतीय संघाने लाजिरवाण्या खेळीमुळे इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका गमावली. इंग्लंडने पाचव्या कसोटीच्या तिस-या दिवशी रविवारी एक डाव व 244 धावांनी भारताचा पराभव केला. यासह इंग्लंडने कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. यात ज्यो रूट सामनावीर, जेम्स अ‍ॅँडरसन आणि भारताचा भुवनेश्वर कुमार मालिकावीरचे मानकरी ठरले.

यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 486 धावांचा डोंगर उभा केला. यासह इंग्लंडने तिस-या दिवशी भारतावर 338 धावांची पहिल्या डावात आघाडी मिळवली होती. प्रत्युत्तरात दुस-या डावात भारताचा 29.2 षटकांत अवघ्या 94 धावांत खुर्दा उडाला. यापूर्वी पाहुण्या भारतीय संघाला पहिल्या डावात 148 धावांत गाशा गुंडाळावा लागला होता.

भारताचे दिग्गज फ्लॉप
भारतीय संघातील दिग्गजांचा दुस-या डावातही फ्लॉप शो ठरला. भारतीय संघाने 46 धावसंख्या असतानाच आपल्या पाच विकेट गमावल्या. सलामीवीर मुरली विजय (2), गौतम गंभीर (3), चेतेश्वर पुजारा (11), अजिंक्य रहाणे (4) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (0) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताकडून विराट कोहलीने 20 आणि स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. यासह या दोघांनी पराभवाचे मोठे अंतर पूर्ण केले.

ज्यो रूटचे शानदार शतक
ज्यो रूटने शानदार 149 धावांची खेळी केली. यासह त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. त्याचे हे मालिकेतील दुसरे शतक ठरले. इंग्लंडने तिस-या दिवशी 69 चेंडूंत 101 धावा काढल्या. या संघाने 7 बाद 385 धावांवरून रविवारी तिस-या दिवशी खेळायला सुरुवात केली होती.

518 धावा ज्यो रूटने या मालिकेत काढल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे.
07 शतके आतापर्यंत या मालिकेत झळकली आहेत. यात भारताच्या दोन फलंदाजांच्या शतकी खेळीचा समावेश आहे.

पावसाचा व्यत्यय
कसोटीच्या तिस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. तत्पूर्वी भारताचा गौतम गंभीर धावबाद झाला होता. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला होता.

25 ऑगस्टपासून वनडे मालिका
येत्या सोमवारपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ पाच वनडे खेळणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघ इंग्लंडच्या मिडलेक्स संघाविरुद्ध लॉडर््सवर सराव सामना खेळेल.

असे झाले भारताचे गडी बाद
षटक खेळाडू धावसंख्या
4.5 षटक मुरली विजय (2) 1-6
6.1 षटक गौतम गंभीर (3) 2-9
12.5 षटक चेतेश्वर पुजारा (11) 3-30
17.5 षटक अजिंक्य रहाणे (4) 4-45
18.4 षटक महेंद्रसिंग धोनी (0) 5-46
23.2 षटक विराट कोहली (20) 6-62
25.2 षटक आर. अश्विन (7) 7-70
25.6 षटक भुवनेश्वर कुमार (4) 8-74
26.6 षटक वरुण अ‍ॅरोन (1) 9-84
29.2 षटक ईशांत शर्मा (2) 10-94

जेम्स अ‍ॅँडरसनचा पुन्हा दबदबा
भारताविरुद्ध इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अ‍ॅँडरसनने आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने विकेट घेण्याची आपली मोहीम रविवारीही कायम ठेवली. त्याने दुस-या डावात भारताचे दोन गडी बाद केले. त्याने सलामीवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला बाद केले. यासह त्याने मालिकेत 25 बळी घेतले. भारतासाठी तो या मालिकेत ख-या अर्थाने कर्दनकाळच ठरला.

धावफलक
भारत पहिला डाव 148. इंग्लंड कालच्या 7 बाद 385 धावांच्या पुढे.
इंग्लंड पहिला डाव धावा चेंडू 4 6
ज्यो रूट नाबाद 149 165 18 1
जॉर्डन झे. धोनी गो. ईशांत 20 33 2 0
ब्रॉड झे. कोहली गो. ईशांत 37 21 5 1
अ‍ॅडरसन पायचीत गो. अश्विन 01 05 0 0
अवांतर : 33. एकूण : 116.3 षटकांत सर्वबाद 486 धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर 24-3-86-1, ईशांत शर्मा 30-8-96-4, वरुण अ‍ॅरोन 29-1-153-2, स्टुअर्ट बिन्नी 12-0-58-0, अश्विन 21.3-2-72-3.
भारत दुसरा डाव धावा चेंडू 4 6
विजय पायचीत गो. अँडरसन 02 16 0 0
गंभीर धावबाद वोक्स 03 19 0 0
पुजारा झे. बटलर गो. अँडरसन 11 19 2 0
कोहली झे. कुक गो. जॉर्डन 20 54 2 0
रहाणे झे. बॅलेंन्स गो. ब्रॉड 04 15 0 0
धोनी झे. रॉबसन गो. वोक्स 00 05 0 0
स्टुअर्ट बिन्नी नाबाद 25 28 4 0
अश्विन झे. बेल गो. जॉर्डन 07 09 1 0
भुवन झे. बेल गो. जॉर्डन 04 04 10
वरुण अ‍ॅरोन धावबाद 01 03 0 0
ईशांत शर्मा झे. अली. गो. जॉर्डन 02 04 0 0
अवांतर : 14. एकूण : 29.2 षटकांत सर्वबाद 94 धावा. गोलंदाजी : अँडरसन 8-3-16-2, ब्रॉड 10-2-22-1, वोक्स 7-0-24-1, जॉर्डन 4.2-0-18-4.