आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE: 5th Test 3nd Day: England Vs India At The Oval, Aug 15 19, 2014 News In Marathi

पराभवानंतर कर्णधारपद सोडण्‍याच्‍या प्रश्‍नावर धोनी म्‍हणाला,\'\'थांबा, थोडी वाट पाहा\'\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारतीय संघाने लाजिरवाण्या खेळीमुळे इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका गमावली. इंग्लंडने पाचव्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी रविवारी एक डाव व 244 धावांनी भारताचा पराभव केला. या पराभवामुळे धोनीच्‍या कर्णधारपदावर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. तेव्‍हा 'थांबा राजीनाम्‍याचा विचार करु नका, मी या पराभवातून सावरु शकतो का नाही याची वाट पाहा' असे महेंद्रसिंह धोनीने सांगितले आहे.
भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय लाजीवरवाणे राहिले आहे. भारतीय संघ 30 षटकेसुध्‍दा खेळू शकला नाही. इंग्‍लंडने भारताविरुध्‍द 1974 नंतर सर्वांत मोठा विजय नोंदवला आहे.
दुस-या कसोटीमध्‍ये मिळविला होता विजय
भारताने लॉर्ड्सवर दुसरी कसोटी जिंकली होती. परंतु साउथम्‍टन, मँचेस्‍टर आणि ओवलवर भारताला लाजीरवाण्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताचे दिग्गज फ्लॉप
भारतीय संघातील दिग्गजांचा दुस-या डावातही फ्लॉप शो ठरला. भारतीय संघाने 46 धावसंख्या असतानाच आपल्या पाच विकेट गमावल्या. सलामीवीर मुरली विजय (2), गौतम गंभीर (3), चेतेश्वर पुजारा (11), अजिंक्य रहाणे (4) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (0) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताकडून विराट कोहलीने 20 आणि स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. यासह या दोघांनी पराभवाचे मोठे अंतर पूर्ण केले.
ज्यो रूटचे शानदार शतक
ज्यो रूटने शानदार 149 धावांची खेळी केली. यासह त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. त्याचे हे मालिकेतील दुसरे शतक ठरले. इंग्लंडने तिस-या दिवशी 69 चेंडूंत 101 धावा काढल्या. या संघाने 7 बाद 385 धावांवरून रविवारी तिस-या दिवशी खेळायला सुरुवात केली होती. 518 धावा ज्यो रूटने या मालिकेत काढल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे.
07 शतके आतापर्यंत या मालिकेत झळकली आहेत. यात भारताच्या दोन फलंदाजांच्या शतकी खेळीचा समावेश आहे.
पावसाचा व्यत्यय
कसोटीच्या तिस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. तत्पूर्वी भारताचा गौतम गंभीर धावबाद झाला होता. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची काही निवडक छयाचित्रे..