आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE: 5th Test: England Vs India At The Oval, Aug 15 19, 2014

148 धावा काढून भारतीय संघ तंबूत, कसोटीवर इंग्लंडची पकड मजबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - शुन्‍यावर बाद झाल्‍यानंतर तंबूत परताना गौतम गंभीर)

ओव्हल - इंग्लंड विरूध्द पाच पैकी दोन कसोटीमध्‍ये मानहाणीकारक पराभव पत्‍करल्‍यानंतर पाचव्‍या कसोटीत भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली आहे. पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय फलंदाज अवघ्‍या 148 धावा करून तंबुत परतले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकतर्फी झुंज देत 82 धावा करून भारतीय संघाला 148 धावांपर्यंत पोहचवले.

इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात दिवसाचा खेळ पूर्ण होईपर्यंत 19 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 62 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे इंग्लंडने शेवटच्या कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे.
अत्‍यंत वाईट सुरुवात
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केले. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरतव इंग्‍लंच्‍या गोलंदाजांनी तुफान मारा करत 36 धावातच भारताचे आघाडीचे पाच मोहरे बाद केले.

भारताकडून सर्वाधिक 82 धावा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केल्या. मुरली विजय 18, गौतम गंभीर 0, चेतेश्वर पुजारा 4, विराट कोहली 6, अजिंक्य राहणे 0, बिन्नी 05, अश्विन 13, भुवनेश्वर कुमार 05, धावा काढून बाद झाले.

भारताने केले दोन बदल
भारतीय क्रिकेट संघात दोन महत्‍वपूर्ण बदल केले गेले आहेत. त्‍यामध्‍ये रवींद्र जडेजाच्‍या जागी स्‍टुअर्ट बिन्‍नी आणि पंकज सिंहच्‍या ऐवजी इशांत शर्माला स्‍थान देण्‍यात आले आहे.

उभय संघ पुढील प्रमाणे
इंग्लंड :
एलिस्टर कुक (कर्णधार), सॅम रॉबसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, जोए रूट, मोइन अली, जोस बटलर (विकेटकीपर), बेन स्टेक्स, क्रिस जॉडर्न, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीव फीन, जेम्स एंडरसन
भारत :
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, गौतम गंभीर, रोहित शर्मा, इशांत शर्मा, नमन ओझा, मोहम्मद समी, स्टुअर्ट बिन्नी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, वरुण आरोन, पंकज सिंह

पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे