इंचियोन - 17 व्या आशियाई खेळामधील आठवा दिवस भारतासाठी 'सुवर्णदिन' ठरला. भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कंपाउंड इव्हेंट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. रजत चव्हाण, अभिषेक वर्मा आणि संदीप कुमार यांनी यजमान दक्षिण कोरिया संघाला मात देत 227 - 225 गुण कमविले.
महिला तिरंदाजांनी मिळविले कांस्य
भारतीय महिला तिरंदाजानी 'कांस्यवेध' घेतला. तृषा देव, पूनम चानू, पुर्वशा शिंदे आणि सुरेखा ज्योती यांनी इराणच्या संघाला 224 - 217 अशी मात देत कांस्यपदक पटकाविले.
आता भारताची तृषा देव आणि अभिषेक वर्मा तिरंदाजीतील वैयक्तिक प्रकारात सेमीफायनलमध्ये खेळणार आहेत.
आता भारताच्या खात्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह 19 पदक आहेत. आज होत असलेल्या स्क्वॅश आणि रेसलिंगमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
पदक तालिकेत भारताचे स्थान
रँक सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
11 2 2 15 19