आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Asian Games Day 12 Latest Medals For India News In Marathi

ASIAN GAMES LIVE: मेरी कोमचा \'गोल्डन पंच\' , भारताला सातवे सुवर्णपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेमीफाइनल जिंकल्‍यानंतर बॉक्सर मेरी कोम)
इंचियोन- 17 व्‍या आशियाई स्‍पर्धेच्‍या 12 व्‍या दिवशी आज भारताच्‍या मेरी कोमने महिला फ्लायवेट गटामध्‍ये सुवर्णपदकाची कामगिरी केली. मेरी कोमने कझाकिस्‍तानच्‍या झैना शेकेरबेकोवाला 2-0 अशा फरकाने पराभूत केले.
मेरी कोमने चार पैकी दोन राऊंडमध्‍ये परफेक्‍ट 30 चा स्‍कोअर तयार केला होता. पहिल्‍या राऊंडमध्‍ये कझाकिस्‍तानची झैना वरचढ ठरली. परंतु दुस-या राऊंडमध्‍ये मेरी कोमने आघाडी घेत. जोरदार पंच लगावत 29-28 अशी आघाडी घेतली. आपला अनुभव पणाला लावत मेरी कोमने तिस-या आणि चौथ्‍या निर्णायक फेरीमध्‍ये झैनाला धुळ चारली.
महिला हॉकीमध्‍ये आज भारतीय टीम कांस्‍य पदकासाठी जपान सोबत लढणार आहे.
आशियाई स्‍पर्धेमध्‍ये आज भारताचे सामने
अॅथलेटिक्स
महिला ट्रिपल जंप फाइनल - एमए प्रजूषा आणि मयूखा जॉनी
800 मीटर धावणे (महिला) - टिंटू लूका आणि सुषमा देवी
महिला भाला फेक फाइनल - अन्नू रानी
महिला 400 मीटर अडथळा शर्यत - अश्विनी अकुंजी
पुरुष 800 मीटर धावणे - सजीश जोसेफ
पुरुष 400 मीटर अडथळा शर्यत - जितिन पॉल
कुस्‍ती (ग्रीको-रोमन)
66 किलो वजनी गट - संदीप तुलसी यादव
75 किलो वजनी गट - गुरप्रीत सिंह
85 किलो वजनी गट - मनोज कुमार
130 किलो वजनी गट - धर्मेंद्र दलाल
पुढे वाचा विकास गौडाला थाळीफेकीत रौप्य....