आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LIVE Asian Games Day 3 Results And Scores In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ASIAN GAMES LIVE: वूशूमध्‍ये पाकिस्‍तानी खेळाडूला नरेंद्रने दिली मात, पदक निश्चित!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - दीपिका पल्‍लीकल- फाइल फोटो)
इंचियोन - 17 व्या आशियाई स्पर्धेमधील तिस-या दिवशी वूशूमध्‍ये भारताला यश मिळाले. पुरुष 60 किलो वजनी गटामध्‍ये भारताच्‍या नरेंद्र गरेवालने पाकिस्‍तानच्‍या अब्‍दुल्‍लाहला पराभूत करुन सेमीफायनलमध्‍ये जागा निश्चित केली. तसेच वूशू याच क्रिडाप्रकारात52 किलो वजनी गटामध्‍ये भारताच्‍या संथोई देवीने मंगोलियाच्‍या खेळाडूचा 2-0 ने पराभव केला.

महिला हॉकीमध्‍ये भारतीय महिला संघाला यश
महिला हॉकी संघाने थायलंड संघाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले आहे. भारताच्‍या पुनम राणीने 15 मिनिटाला भारतासाठी गोलचे खाते उघडले. तिस-या क्‍वॉर्टरमध्‍ये वंदना कटारियाने अप्रतिम गोल करत सामन्‍यामध्‍ये 2-0 ने आघाडी घेतली. तर अंतीम गोल दीपिकाने केला. तर थायलंड संघ गोल करण्‍यात असमर्थ ठरले.
बास्‍केटबॉलमध्‍ये मिळाला विजय
बास्‍केटबॉलमध्‍ये भारताच्‍या पुरुष संघाने कझाकिस्‍तानला 80-51 अशा फरकाने पराभूत केले.
स्‍क्‍वॅशपटू दीपिका पल्‍लीकला कास्‍य
स्‍क्‍वॅशपटू दीपिका पल्‍लीकला कास्‍यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्‍या निकोल डेविडने 11-4, 11-4, 11-5 अशा फरकाने दीपिकाचा पराभव केला. सध्‍या सौरव घोषालच्‍या खेळीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या पदकासह भारताची पदकसंख्‍या सहा झाली आहे.
ALERT: राही सरनबोत 25 मीटर पिस्‍टल पिस्टल रॅपिड प्रकारात सेमीफाइनल गाठली. अनीसा 10 व्‍या आणि हीना 17व्‍या स्‍थानी कायम राहिली.
व्‍हॉलीबॉल : महिलांच्‍या पात्रता फेरीमध्‍ये भारतीय संघाला जपानकडून 25-6, 25-11, 25-12 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
शुटिंगमध्‍ये कास्‍य
भारतीय महिला नेमबाजांनी तिस-या दिवशी चांगली कामगिरी केली. हीना सिध्‍दू, राही सरनोबत, आणि अनीसा सय्यद यांनी 25 मीटर पिस्‍टल सांघिक प्रकारात कास्‍य पदक पटकाविले.
पोहणे - प्रधापन नायर 50 मीटर बॅकस्‍ट्रोक फायनलमध्‍ये पात्र ठरण्‍यास विफल ठरला. आपल्‍या हीटमध्‍ये तो सहाव्‍या स्‍थानी होता.
टेनिस: सनम सिंहला पराभवाचा सामना करावा लागला. कझाकीस्‍तानच्‍या अॅलेक्‍झांडर नेडोव्‍येसोवने उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍ये 7-6, 7-6 अशा फरकाने सनम सिंहला मात दिली.
शुटिंग - अयोनिका पॉल 10 मीटर महिला एअर रायफलमध्‍ये अंतीम फेरीमधून बाहेर
पुढील स्‍लाइडवर पाहा, तिस-या दिवशी कोणत्‍या नेमबाजांनी मारली बाजी