आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LIVE Asian Games Day 5 Latest Scores And India Medals News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Asian Games LIVE: वेटलिफ्टिंगमध्‍ये विकास ठाकूरने पटकाविले प्रथम स्‍थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - 17 व्‍या आशियाई स्‍पर्धेच्‍या पाचव्‍या दिवशी भारताच्‍या वेटलिफ्टरने चांगली कामगिरी करत 85 किलो वजनी गटामध्‍ये प्रथम स्‍थान पटकावले आहे. त्‍याने एकूण 327 किलो वजन उचलले.
तत्‍पुर्वी आज भारतासाठी पदकाचे खाते दुश्‍यंतने रोईंग या खेळामध्‍ये उघडले. दुश्‍यंतने पुरुष सिंगल स्‍कल्‍समध्‍ये कास्‍य पदकाची कमाई केली. दुश्‍यंतने 2000 मीटरचे अंतर 7 मिनिट 23.94 सेकंदामध्‍ये पुर्ण केले.
बॉक्‍सींगमधील56 किलोग्रॅम वजनी गटामध्‍ये भारताच्‍या शिव थापाला वॉकओव्‍हर मिळाला. बॉक्सिंगमध्‍ये भारताचा पुढील सामना सायं. चार वाजता होणार आहे. लाइटवेट (60) किलो वजनी गटामध्‍ये भारताचा अखिल कुमार नेपाळच्‍या पूर्णा बहादुरसोबत लढणार आहे.

आज होणारे भारताचे सामने
1. दुपारी 1:30 वाजता - महिला हॉकी, चीन विरुध्‍द
2. दुपारी 1:30 वाजता - स्‍क्‍वॅश, पाकिस्‍तान महिला संघाविरुध्‍द
3. दुपारी 2:30 वाजता - स्‍क्‍वॅश, चीनच्‍या पुरुष संघाविरुध्‍द
4. सायंकाळी 4 वाजता - बॉक्सिंगमध्‍ये अखिल कुमार नेपाळच्‍या पूर्णा बहादुरसोबत लढणार आहे.

बॅडमिंटन - भारताची स्‍टार बॅडमिंटनपटू पीव्‍ही सिंधूने मकाऊच्‍या किट लेंग वॉन्‍गला 21-7, 21-13 अशा फरकाने पराभूत करुन राऊंड ऑफ 16 मध्‍ये पोहोचली.

सायना नेहवाल जिंकली
  • सायना नेहवालने राउंड ऑफ 32 मध्‍ये मकाउुच्‍या यू टेंग लॉकला 21-10, 21-8 अशा फरकाने पराभूत केले.
  • पुरुष दुहेरीमध्‍ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी मालदीवला 2-0 ने पराभूत केले.
  • महिला दुहेरीमध्‍ये भारतीय संघाने नेपाळला 2-0 ने पराभूत केले.

शुटिंग
25 मीटर रॅपिड फायर पिस्टल (पुरुष) - हरप्रीत 7व्‍या, गुरप्रीत 12व्‍या आणि तमांग 20व्‍या स्‍थानी आहे.

50 मीटर राइफल प्रोन फाइनल्स (महिला) - भारतीय टीम 11व्‍या स्थानी राहिली.
50 मीटर राइफल प्रोन वैयक्तिक(महिला) - लज्जाकुमारी 25व्‍या, चौधरी 22व्‍या आणि तेजस्विनी 36व्‍या स्‍थानी राहिली.

भारताची मेडल टॅली अशाप्रकारे
रँक
सुवर्ण
रौप्‍य
कांन्‍स
एकूण
14
1
1
10
12
पुढील स्‍लाइडवर पाहा, आजची आशियाई खेळातील निवडक छायाचित्रे..