आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LIVE Asian Games Day 6 Latest India Medals And Results, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Asian Games LIVE:पुरुष तिरंदाज \'सुवर्णपदका\'च्‍या शर्यतीत, रोइंगमध्‍ये कांन्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन : 17 व्‍या आशियाई स्‍पर्धेमधील सहाव्‍या दिवशी तिरंदाजीमध्‍ये भारतीय पुरुष तिरंदाजांनी इरानला 231-227 अशा फरकाने पराभूत करुन अंतीम फेरीत धडक दिली आहे. यासोबतच तिरंदाजीमध्‍ये भारताचे रौप्‍य पदक निश्चित झाले आहे. सुवर्णपदकासाठीची लढत 27 तारखेला असणार आहे. भारतीय सुवर्णपदक पटकावतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज स्‍पर्धेच्‍या सहाव्‍या दिवशी भारताचे खेळाडू खालील प्रकारात सहभाग घेणार आहेत.
तिरंदाजी - भारत विरुध्‍द कतार
बॅडमिंटन
पुरुष मिश्र दुहेरी: अक्षय देवाळकर, प्रज्ञा गद्रे
एकेरी : पी. कश्‍यप, मन्‍नु अत्री, सिक्‍की रेड्डी, के. श्रीकांत
दुहेरी : सायना नेहवाल,- पी. व्‍ही सिंधू
बॉस्किंग - एल द्रेवेंद्रसिंग, मनोज कुमार
सायकलिंग - अमरजिसिंग नेगी आणि अमृतसिंग
अश्‍वारोहन - वैयक्तिक आणि सांघिक फेरी- संग्रामसिंग, फौआद मिर्झा, एम. एस. राठोड, अजय पुवय्या
हॉकी : पुरुष गट भारतविरुध्‍द पाकिस्‍तान दुपारी दीड वाजता
रोईंग : महिला स्‍कल्‍स फायनल आणि पुरुष स्‍कल्‍स फायनल
सेलिंग : पुरुष आणि महिला गटातील आप्टिमिस्‍ट रेस
सेपक टॅकरॉ : पुरुष भारताविरुध्‍द कोरिया, महिला भारविरुद कोरिया
बॉक्सिंग : अखिल, थापा प्रीक्वार्टरमध्ये
बॉक्सिंगमध्येमाजी चॅम्पियन अखिलकुमार, शिवा थापा यांनी प्रीक्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या अिखलने नेपाळच्या पूर्ण बहाद्दूर लामाला पुरुषांच्या 60 किलो लाइट वेट गटाच्या पहिल्या फेरीत पराभूत केले. अखिलने सहज बाजी मारली. दुसरीकडे शिवा थापाला तिमोर ल्युस्टेचा लियोनल परादा हेलोकडून पुढे चाल मिळाली.
स्क्वॅशमध्ये महिला खेळाडू चमकल्या
दीपिकापल्लिकल, जोश्ना चिनप्पा आणि अनाका अलंकामोनी या त्रिकुटाने स्क्वॅशमध्ये महिला सांघिक स्पर्धेत हाँगकाँगला 2 -1 ने हरवले. दीपिका पल्लिकलने सुरुवात केली. मात्र, तिला हाँगकाँगच्या ए.यू.विग ची एनीने 2-3 ने हरवले. दुसऱ्या एकेरीत जोश्ना चिनप्पाने चान हो लीगला 3-2 ने पराभूत केले. अनाका अलंकामोनीने अखेरच्या लढतीत भारताला विजय मिळवून दिला.
टेनिस : भारताने पाकिस्तानला हरवले
भारताने टे‍निसच्या महिला दुहेरीतील पहिल्या लढतीतच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2 -0 ने पराभूत करून शानदार सुरुवात केली. भारताची श्वेता चौधरी आणि रिशिका सुनहारा यांनी पाकिस्तानची सारा मन्सूर आणि उश्ना सुहेल या जोडीला अवघ्या 57 मिनिटांत पराभूत केले. भारतीय खेळाडूंनी या लढतीत 6 -4, 6 -0 ने विजय मिळवला. एकेरीत नताशाचा पराभव झाला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, इंचियोन मधील लेटेस्‍ट फोटो