आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE AUS Vs ENG : England Won The Toss And Elected To Field News In Marathi

WC दुसरा सामना: 231धावांवर इंग्लंडचा खुर्दा, 111 धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- 'विश्वचषक-2015'तील ग्रुप 'A'च्या दुसर्‍या सामन्या ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 342 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी कांगारुंच्या भेदक मार्‍यापुढे नांग्या टाकल्या आणि ऑस्ट्रेलियाचा 111 धावांनी दणदणीत विजय झाला.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल मार्श सध्या फॉर्मात आहे. त्याच्यासमोर इंग्लिश संघाने अक्षरश:गुडघे टेकले. मार्शने सलग दोन विकेट घेतल्या. इंग्लंडने 41.5 षटकात सर्व बाद 231 धावा केल्या.

इंग्लंडचे सलामीवीर मोईन अली आणि गॅरी बॅलेंस 10-10 धावा काढून तंबूत परतले. अलीला स्टार्कने तर बॅलेंसला मार्श आऊट केले. नंतर मार्शने इयान बेलला 36 तर रूटला अवघ्या पाच धावांवर तंबूत पाठवले.
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने धडकेबाज फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी 343 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने आरोन फिंचचे शानदार शतक (135), जॉर्ज बेली (55) आणि ग्लेन मॅक्सवेलचे (66) अर्धशतकाच्या जोरावर नऊ विकेटवर 342 धावा केल्या. इंग्लंडचा स्टीव्हन फिनने भेदक गोलंदाजी करत 71 धावा देऊन पाच विकेट घेतल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वार्नर आणि आरोन फिंचने ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात करून दिली. मात्र, आठव्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला तंबूत पाठवले. वार्नरने 22 धावा केल्या. वार्नरपाठोपाठ वॉटसनला (0) देखील ब्रॉडने बाद केले. स्टीव्हन स्मिथच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला. स्मिथला व्होक्सने आऊट केले. स्मिथला फक्त पाच धावा करता आल्या.

दरम्यान, जगभरातील चाहत्यांच्या नजरा मेलबर्नवर होणार्‍या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीकडे होत्या. या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना पाहण्यासाठी 90 हजार चाहते स्टेडियमवर होते. विश्वचषक विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार आहे. मागच्या 12 सामन्यांत फक्त एक सामना त्यांनी गमावला. चार वेळेच्या चॅम्पियन संघाने गेल्या काही दिवसांपूर्वीच तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये इंग्लंडला हरवले होते. आज पुन्हा इंग्लंडला पराभूत करुन त्यांनी चॅम्पियन असल्याचे सिद्ध केले आहे.

संघ
ऑस्ट्रेलिया:
मायकल क्लार्क, जॉर्ज बेली, पेट कमिंस, जेव्हिअर डोहर्टी, जेम्स फल्कनर, एरॉन फिंच, ब्रांड हॅडिन, जोश हेजलवुड, मिचेल जॉनसन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन.

इंग्लंड: इयान मोर्गन, जोस बटलर, मोईन अली, जेम्स अँडरसन, जॅरी बॅलेंस, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीव्हन फिन, एलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस व्होक्स.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड लढतीचा रोमांच...