आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Australia Won The Toss And Elected To Field

कांगारुंची विजयाची हॅटट्रिक, ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय, स्मिथचे शानदार पदार्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होबार्ट- तिरंगी मालिकेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीवन स्मिथच्या (102) नाबाद शतकी कामगिरीच्या जोरावर इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत हॅटट्रिक केली असून फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे.

यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिकूंन प्रथम फलंदाजी करण्‍यासाठी इंग्लंडला आमंत्रित केले होते. इंग्लंड संघाने इयन बेल (141) यांच्या शानदार शतकाच्या मदतीने निर्धारित 50 षटकात 8 विकेटच्या नुकसानावर 303 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रे‍लियाने हे आव्हान 49.5 षटकात सात विकेटच्या नुकसानावर गाठले.

कर्णधार स्मिथ याने 95 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबात 102 धावा केल्या. कसोटी तसेच वनडे किक्रेट संघाचा कर्णधार म्हणून स्मिथने शानदार पदार्पण केले केले आहे. स्मिथने डिसेंबरमध्ये ब्रिस्बेनमध्ये भारताविरोधात शतक ठोकले होते.

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि सलामीवीर इयन बेल याने 125 चेंडून शानदार 141 धावा केला. याता एक षटकार आणि 15 चौकारचा समावेश आहे. याशिवाय मोइन अली याने 48 चेंडूत 46 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय...
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेत दोन सामन्यात विजय मिळावला आहे. मालिकेच्या पहिल्या ऑस्ट्रेलियाने सामन्यात इंग्लंडचा तीन विकेट पराभव केला होता. दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट राखून विजय मिळवला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, छायाचित्रांमधून ऑस्ट्रेलिया Vs इंग्लंड लढतीमधील रोमांच