आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Commonwealth Games 2014 Day 6 Live Score Sushil Kumar News In Marathi

कुस्तीत तीन सुवर्ण... भारताची एकाच दिवशी नऊ पदकांची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी मंगळवारी भारताच्या तीन पहिलवानांनी सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले तर नेमबाजीत दोन रौप्य व तीन कांस्यपदके पटकावली.

कुस्तीत तीन सुवर्ण...

पहिले सुवर्ण

सुशील (74 किलो)
० अंतिम लढतीत पाकिस्तानच्या अब्बासला केले 8-0 ने पराभूत.
० उपांत्य लढतीत नायजेरियाच्या बिबोला केले 8-4 ने पराभूत.
०उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेच्या कुशनला 10-0 ने चारली धूळ.
० पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन्सवर केली 11-0 ने मात

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक शक्य
नायजेरियाची सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर चिका अमाल्हा डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे. अमाल्हाने 53 किलोग्राम वजनगटात सुवर्णपदक पटकावले होते. जर, तिच्याकडून पदक परत घेतले गेले तर या गटात कांस्यपदक पटकावणार्‍या संतोषीला रौप्य आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या स्वातीला कांस्यपदक मिळू शकते.