आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Cricket Score Australia Vs India, 4th Test 2nd Day

सिडनी कसोटी 2nd day: 501 धावांचे आव्हान, भारत पहिल्या डावात एक बाद 71

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - टीम इंडियाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एक गडी गमावत 71 धावा केल्या. भारताचा मुरली विजय शुन्यावर बाद झाला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल नाबाद आहेत. मुरलीला मिचेल स्टार्कने पहिल्या ओव्हरमध्येच खातेही न खोलू देता तंबुत परत पाठवले.

नाबाद राहिलेल्या राहुलची ही कारकीर्दीतील दुसरी कसोटी आहे. त्याने रोहित सोबत डाव सावरला. त्यांनी 71 धावांची भागीदारी केली. रोहितने 76 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार लगावले. तर, मेलबर्न कसोटीत निराशाजनक खेळी करणार्‍या राहुलने मैदानावर चांगला जम बसवला आणि 71 चेंडूंचा सामना करताना दोन चौकार लगावले. भारतीय संघाने 25 ओव्हरमध्ये 71 धावा केल्या. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाच्या 501 धावा मागे आहे.

कांगारुंची रणनीती यशस्वी...
ऑस्ट्रेलियाने दोन शतक आणि चार अर्धशतकांच्या बळावर भारताविरोधात पहिल्या डावात 7 विकेट गमावत 572 धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात कर्णधार स्टिव्हन स्मिथ (117) आणि शेन वॉटसन (81) या महत्वाच्या दोन विकेट गमावल्या. तर, दुसर्‍या सत्रात शॉन मार्श (73) बाद झाला.
दिड दिवस क्षेत्ररक्षण केल्यामुळे भारतीय संघातील फलंदाज थकले असतील, त्यामुळे आघाडीच्या एक-दोन विकेट आज मिळविता येतील या रणनीतीने ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या या रणनीतीचा फायदा त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला देखील.
दुसर्‍या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर शेन वॉटसनच्या रुपाने भारताला पहिले यश मिळाले. मोहम्मद शमीने त्याला 81 धावांवर बाद केले. त्यानंतर पहिल्या दिवशी नाबाद खेळी करणारा कर्णधार स्टिव्हन स्मिथ शतक (117) पूर्ण करुन बाद झाला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर विकेटकीपर रिद्धीमान सहाच्या हाती झेल देत तो बाद झाला. स्मिथने 201 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 117 धावा केल्या.

पहिल्या दिवसाची रोमांचक खेळी
सलगच्या विजयाने आत्मविश्वास बुलंदीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने मंगळवारी भारतविरुद्ध चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केली. यजमानांनी पहिल्या दिवसअखेर दोन गड्यांच्या मोबदल्यात 348 धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर (101) आणि रॉजर्स (95) यांच्या द्विशतकी भागीदारीच्या बळावर कांगारूंनी धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर शेन वॉटसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथने अभेद्य 144 धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा वॉटसन (61) आणि स्मिथ (82) मैदानावर खेळत आहेत. भारताच्या शमी आणि आर. अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉजर्स आणि वॉर्नर यांनी संघाला 200 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यासह या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली.दरम्यान, भारताच्या गोलंदाजांनी ही जोडी फोडण्यासाठी झुंज दिली. अखेर 44.5 षटकांत आर. अश्विनने संघाला वॉर्नरच्या रूपाने पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठोपाठ मोहंमद शमीने 44.5 षटकांत संघाला दुसरा महत्त्वाचा बळी मिळवून दिला.

फोटो - रोहित शर्मा