आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Cricket Score In Marathi, 1st Test: India Vs South Africa, Day 5

रोमांचक कसोटी अखेर ड्रॉ ! विजयासाठी 458 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या 450 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - कोण जिंकेल, आफ्रिका की टीम इंडिया ? या एका प्रश्नाने तमाम चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन्ही संघाकडे विजयाची संधी असल्याने असे होत होते. अखेर जोहान्सबर्ग कसोटी ड्रॉ झाली. आफ्रिकेला विजयासाठी 458 धावांची गरज होती. मात्र, आफ्रिकेला 136 षटकांत 7 बाद 450 धावाच काढता आल्या. थोडक्याने त्यांचा विजय हुकला.
डु प्लेसिसची विकेट महत्त्वाची
भारताने विजयासाठी दिलेल्या 458 लक्ष्याचा पाठलाग करताना डु प्लेसिस (134) आणि डिव्हिलर्स (103) यांच्या शतकांनी आफ्रिकेला विक्रमी विजयाची संधी निर्माण केली होती. मात्र, सामना संपायला अवघे 19 चेंडू शिल्लक असताना डु प्लेसिस बाद झाला, त्या वेळी आफ्रिकेला विजयासाठी 19 चेंडूंत 16 धावांची तर भारताला 3 विकेटची गरज होती. आफ्रिकेचे सर्व तज्ज्ञ फलंदाज बाद झाल्याने तळाच्या फलंदाजांवर ही जबाबदारी होती. मात्र, शेवटच्या क्षणी भारताकडेही विजयाची संधी निर्माण झाल्याने आफ्रिकेने जोखीम न घेण्याचे ठरवले आणि सामना ड्रॉ झाला.
जगप्रसिद्ध अ‍ॅशेस मालिकेचेही सामने रोमांचक होत नाहीत इतकी ही लढत अंगावर शहारे आणणारी ठरली. डिव्हिलर्स आणि डु प्लेसिस यांनी पाचव्या विकेटसाठी 205 धावांची भागीदारी करून आफ्रिकेच्या आशा पल्लवित केल्या. आफ्रिकेला धावांचा पाठलाग करून सर्वात मोठा विजय मिळवण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र, हे दोन्हीही फलंदाज बाद झाल्याने त्यांची ही संधी हुकली.
डु प्लेसिसने 309 चेंडूंचा सामना करताना 15 चौकारांसह 134 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या शतकाने सामन्याचे चित्र बदलले. डिव्हिलर्सने 168 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार मारले.

सविस्तर वाचण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा..