फोटो - शॉट खेळताना रैना
कटक - भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिलाच सामना कटक येथील बाराबाती स्टेडिअमवर खेळल्या जात असून श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
भारताने 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 363 धावांचा डोंगर उभारला आहे. प्रतयुत्तरादाखल उतरणा-या श्रीलंकेसमोर हे आव्हान पार करणे कठीण असणार आहे.
रैनाच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण
सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असलेल्या सुरेश रैनाने तडाखेबंद फलंदाजीचे दर्शन घडवताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या.रैनाने आज 34 चेंडूंचा सामना करताना 52 धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेच्या रणदीवने 3 तर ए.प्रियरंजन आणि एल गमागे यांना प्रत्येकी एक विकेट घेतली
पहिल्या विकेटसाठी 231 धावांची भागीदारी
भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी आश्वासक धावसंख्या उभारली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (111) आणि शिखर धवर (113) धावा करत विक्रमी भागीदारी केली.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीशिवाय भारतीय संघ या मालिकेत खेळत आहे. धोनीला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी
विराट कोहली नेतृत्व करीत आहे. तर अँग्लो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ चांगली कामगिरी करीत आहे.
अर्धावर दौरा सोडून गेला होता वेस्ट इंडिज संघ
वेस्ट इंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी प्रयाण केल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेला
आपला संघ भारतात पाठवण्यास विनंती केली. श्रीलंकन बोर्डाने ही विनंती मान्य केली आणि आता दोन्ही देशांत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे.
उभय संघ
भारतीय टीम : अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायुडू, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव आणि वरुण आरोन
श्रीलंका टीम : उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने,ए.प्रियरंजन,ए.मॅथ्यूज (कर्णधार), तिषारा परेरा, एस.प्रसन्ना, धामिका प्रसाद, एन.कुलसेकरा, सूरज रणदीव या एल.गमागे
पुढील सलाइडवर पाहा, सामन्यादरम्यानचा थरार, छायाचित्राच्या माध्यमातून