आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Glasgow Commonwealth Games India Medal Hope On Day 6 News In Marathi

CWG : जितू रॉयने साधला सुवर्ण वेध; गुरपाल, विकास, गगनला रौप्यपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - भारतीय नेमबाजांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारचा दिवस गाजवला. युवा खेळाडू जितू रॉयने संस्मरणीय कामगिरी करताना 50 मीटर पिस्तूल पुरुषांच्या स्पर्धेत फायनलमध्ये गेम्स रेकॉर्ड करताना सुवर्णपदकावर नेम साधला. मागच्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पुरुष खेळाडू गगन नारंगने 50 मीटर रायफल प्रोन पुरुष स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. भारताला जितूच्या सुवर्णपदकासोबत आणखी एक यश मिळाले. त्याच गटात भारताच्या गुरपालसिंगने रौप्यपदक जिंकून भारताचा आनंद द्विगुणित केला.
जितू आणि गुरपालच्या पदकानंतर त्यांच्या गटात ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल रेपाचोलीने कांस्यपदक मिळवले. जितूचे सुवर्ण आणि गुरपालचे रौप्यपदक भारताच्या ताब्यात आल्यानंतर काही वेळाने गगन नारंगने 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

22 वर्षीय सतीशने स्नॅचमध्ये 149 किलो आणि क्लिन अँड र्जकमध्ये 179 किलो वजन उचलले. रवीने स्नॅचमध्ये 142 किलो आणि क्लीन अँड र्जकमध्ये 175 किलो वजन उचलले. ऑस्ट्रेलियाचा फ्रँकोइस इताउंदीने 314 किलो वजन उचलत कांस्यपदक आपल्या नावे केले. या दोन पदकांनी भारोत्तोलनात भारताच्या खात्यात आणखी पदके वाढवली.
भारताची आजची पदके
50 मीटर पिस्तूल सुवर्ण - जितू रॉय (194.1) रौप्य - गुरपाल सिंग (187.2)
50 मी. रायफल प्रोन रौप्य - गगन नारंग (203.6)

वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत भारताला चार पदके.
317 किलो वजन उचलणारा रवी कातुलू दुसरा.
328 किलो वजन उचलून सतीशने जिंकले सुवर्ण
मंगळवारचे भारतीय खेळाडूंचे सामने
अॅथलेटिक्स : सिद्धांत (110 मी. अडथळा शर्यत),
बॅडमिंटन : महिला व पुरुष एकेरी सामन्यांना सुरुवात
बॉक्सिंग : मनोजकुमार (64 किलो), सुमीत संगवान (81 किलो), सरिता देवी (60 किलो), पूजा राणी (75 किलो).
जिम्नॅस्टिक : आशिष कुमार, राकेश पात्रा, दीपा कर्माकर, प्रणीत दास, प्रणीत नायक, अरुणा रेड्डी, ऋचा दिवेकर.
हॉकी : भारत-ऑस्ट्रेलिया (पुरुष)
लॉन टेनिस : सुनील बहादूर, दिनेश कुमार, समित मल्होत्रा, कमल शर्मा, चंदन सिंग (पुरुष). लवली चौबे, तानिया चौधरी, नयन मोनिया सौकिया, रूपा राणी टिर्की (महिला).
नेमबाजी : गगन नारंग (50 मी. रायफल थ्री पोझिशन), विजय कुमार (25 मी. रॅपिड फायर पिस्तूल), मानवजित (पुरुष ट्रॅप), र्शेयसी, सीमा तोमर (महिला ट्रॅप), गोस्वामी, एलिझाबेथ सुसन (50 मी. रायफल थ्री पोझिशन).
कुस्ती : ज्योती (75 कि. महिला), अमित कुमार (57 कि. पुरुष), सुशील कुमार (74 कि.), राजीव तोमर (125 किलो).
छायाचित्र - नेमबाजीत पदक जिंकल्यानंतर भारताच्या गुरपालसिंग आणि जितू रॉयने छायाचित्रकारांना अशी पोझ दिली.